अहमदनगर : रस्त्याची कामे तातडीने मार्गी लावण्याचे महापौरांचे आदेश

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अहमदनगर : रस्त्याची कामे तातडीने मार्गी लावण्याचे महापौरांचे आदेश

नगर - प्रतिनिधी शनी चौक ते जुनी मनपा रस्त्याच्या सुरु असलेल्या कामाची पाहणी महापौर सौ.रोहिणी शेंडगे यांनी  केली. याप्रसंगी आयुक्त  शंकर

विद्यार्थी प्रगत तर राष्ट्र प्रगत: महापौर रोहिणी ताई शेंडगे
नगर शहरातून जाणार्‍या राष्ट्रीय महामार्गांची प्रलंबित कामे लवकरात लवकर पूर्ण व्हावीत
मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण देणार – महापौर रोहिणी शेंडगे

नगर – प्रतिनिधी

शनी चौक ते जुनी मनपा रस्त्याच्या सुरु असलेल्या कामाची पाहणी महापौर सौ.रोहिणी शेंडगे यांनी  केली. याप्रसंगी आयुक्त  शंकर गोरे, माजी विरोधीपक्ष नेते संजय शेंडगे, माजी महापौर सुरेखा कदम, नगरसेविका सुवर्णा गेनप्पा, नगरसेवक गणेश कवडे, माजी शहरप्रमुख संभाजी कदम, संतोष गेनप्पा, प्रशांत गायकवाड, इंजि.सुरेश इथापे, श्रीकांत निंबाळकर,  रसिक कोठारी, शौकत सर, सोपान सुडके, अब्दुलभाई, आनंद पडोळे, दिलिप कटारिया, बबलू शिंदे, अशोक दहिफळे, किशोर कानडे आदि उपस्थित होते.

     याप्रसंगी महापौर रोहिणी शेंडगे म्हणाल्या, पावसामुळे शहरातील रस्त्याच्या दुरावस्था झाली आहे, आता पाऊस थांबला असल्याने पॅचिंगच्या कामाला गेल्या 15 दिवसांपासून सुरुवात करण्यात आलेली आहे. शहरातील बरेचशे रस्त्यांवर पॅचिंग झाले आहे. शनी चौक ते जुनी मनपा पर्यंतचा रस्ता चांगला व दर्जेदार होण्यासाठी या भागातील ड्रेनेज लाईन, पिण्याच्या पाईपलाईन टाकण्याचे काम करण्यात करण्यात येत आहे, जेणे करुन भविष्यात यासाठी वारंवार खड्डे खणण्याची वेळ येणार नाही. ही कामे तातडीने होण्यासाठी संबंधित ठेकेदारास जादा कामगार लावण्याची सूचना देण्यात आल्या आहेत. या रस्त्यावर मुरुम टाकून रस्ता वाहतुकीसाठी सुरु करण्यात येईल व पुढील कामे सुरु राहतील. लवकरच हा रस्ता चांगला होऊन नागरिक व व्यवसायिकांची अडचण दूर होईल. त्याचप्रमाणे शहरातील सर्वच रस्त्यांची कामे तातडीने पुर्ण करण्याचे आदेश महापौरांनी संबंधितांना दिले.

याप्रसंगी सुरेखा कदम म्हणाल्या, शहराच्या मध्यवस्तीतील व बाजारपेठेला जोडाणारा हा महत्वाचा रस्ता असल्याने

या रस्त्यावर वारंवार खड्डे पडत. हा रस्ता चांगला होण्यासाठी पाठपुरावा करुन या रस्त्याचे काम सुरु केले आहे. ड्रेनेज लाईन, पिण्याची लाईन यांचे कामेही या अंतर्गत केल्यानंतर रस्ता होणार असल्याने हा रस्ता चांगल्यापद्धतीने होईल. सध्या नागरिक व व्यवसायिकांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. रस्त्याचे काम लवकरात लवकर व्हावे, यासाठी महापौर रोहिणी शेंडगे, आयुक्त यांना रस्त्याचे काम तातडीने व्हावे, अशी विनंती केली असल्याचे सांगितले.

     याप्रसंगी आयुक्त शंकर गोरे यांनीही या रस्त्या संदर्भात संबंधित ठेकेदारांना काम तात्काळ होण्यासाठी मनुष्यबळ वाढवून सर्वच कामे तातडीने पुर्ण करावेत. अधिकार्‍यांनही दर्जेदार काम होण्यासाठी यात लक्ष घालावे, अशा सूचना केल्या.

COMMENTS