Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

काही लोकांना काहीही न करता उद्घाटनाची हौस : आ जयंत पाटील

इस्लामपूर / प्रतिनिधी : एखादे विकास काम किंवा एखादी योजना 15-20 दिवसात मंजूर होत नाही. त्यासाठी काही महिने पाठपुरावा करावा लागतो. मात्र, काही लोक

काव्यप्रहार
राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येण्यासाठी हालचाली; सुसंवादासाठी प्रयत्न सुरु असल्याची शरद पवारांची माहिती
छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार युवा पिढीपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न : ना. उदय सामंत

इस्लामपूर / प्रतिनिधी : एखादे विकास काम किंवा एखादी योजना 15-20 दिवसात मंजूर होत नाही. त्यासाठी काही महिने पाठपुरावा करावा लागतो. मात्र, काही लोकांना काहीही न करता उद्घाटनाची हौस सुटल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री आ. जयंत पाटील यांनी हुबालवाडी (ता. वाळवा) येथील समारंभात बोलताना केली. आपण गेल्या 35-40 वर्षात श्रेयवाद व सत्तेच्या राजकारणा पेक्षा लोकांची सेवा केली असल्याची भावना ही त्यांनी व्यक्त केली.
हुबालवाडीसाठीच्या 3 कोटी 13 लाख रुपये खर्चाच्या स्वतंत्र पाणी पुरवठा योजनेचे आ. पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन
करण्यात आले. याप्रसंगी आयोजित समारंभात ते बोलत होते. ज्येष्ठ उद्योजक बाबुराव हुबाले, ज्येष्ठ नेते सिताराम हुबाले (गुरुजी), हौसेराव भोसले, प्रकाश कणप, सरपंच चांगदेव कांबळे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, संजय पाटील, महिला तालुकाध्यक्षा सुनीता देशमाने, युवक तालुकाध्यक्ष संग्राम जाधव, संचालक विठ्ठलतात्या पाटील प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी युवक अध्यक्ष सुरज नांगरे व महिला अध्यक्षा सुरेखा पुजारी तसेच जागा दिल्याबद्दल सयाजी पाटील, भास्कर जाधव यांचा सत्कार करण्यात आले.
आ. पाटील म्हणाले, सामान्य माणसाच्या जीवनात सुखाचे चार दिवस कसे येतील? यासाठी आपण सातत्याने प्रयत्न केलेला आहे. आपल्या गावाला पुढील 30 वर्षे शुध्द व नियमित पिण्याचे पाणी मिळेल, अशी योजना दिली आहे. आपण आपले सरकार असताना हुबालवाडीसह तालुक्यातील पाणी पुरवठा योजनांचा पाठपुरावा करण्यासाठी खास माणसाची नेमणूक केली होती. काही महिने पाठपुरावा केल्यानंतर या योजनांना मंजुरी मिळाली आहे. आपण एकसंघपणे ग्रामपंचायत निवडणुकीस सामोरे जावा. निश्‍चित मोठा विजय मिळेल. युवक व महिला पदाधिकार्‍यांनी सामान्य माणसाचे प्रश्‍न सोडविण्याचे काम करावे.

COMMENTS