Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दिसतोय बदल… होतोय विकास… पोस्टर्सची इस्लामपूरात चर्चा

इस्लामपूर / प्रतिनिधी : इस्लामपूर नगरपालिका निवडणूकीसाठी पालिकेतील नेते, कार्यकर्ते आपल्या प्रभागात सक्रिय होताना दिसत आहेत. पालिकेसाठी इच्छुक अस

गर्भवती वनरक्षक महिलेला माजी सरपंचाकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण
शाळाबाह्य मुलांना सहल घडवत इस्लामपूरमध्ये व्हॅलेंटाईन डे साजरा
सांगली भाजप जिल्हाध्यक्ष पदाची माळ निशिकांत पाटील यांच्या गळ्यात पडणार?

इस्लामपूर / प्रतिनिधी : इस्लामपूर नगरपालिका निवडणूकीसाठी पालिकेतील नेते, कार्यकर्ते आपल्या प्रभागात सक्रिय होताना दिसत आहेत. पालिकेसाठी इच्छुक असणार्‍यांनी प्रभागात विकास कामाबरोबरच शक्ती प्रदर्शनावरही भर दिला आहे. सध्या शहरात माजी मंत्री जयंत पाटील यांनी प्रभाग बैठका घेऊन आगामी पालिका निवडणूकीसाठी राष्ट्रवादीमय वातावरण तयार केले आहे. गेल्या पाच वर्षात नगराध्यक्ष विकास आघाडीचा आणि राष्ट्रवादीचे संख्याबळ जास्त असल्याने विकास कामांना खीळ बसली होती. मंत्री पाटील यांच्या दिसतोय बदल होतोय विकास या पोस्टर्सची शहरात चर्चा सुरू आहे.
सध्या विकास आघाडीच्या नेत्यांमध्ये शांतता पसरली असल्याने विकास आघाडीतील गटांमध्ये पालिकेच्या निवडणुकीसाठी हालचाली दिसून येत नाहीत. राष्ट्रवादीने केलेल्या विकास कामावर व मंजूर केलेल्या निधीवर निवडणुकीसाठी वातावरणनिर्मिती करण्यास सुरुवात केली आहे. शहरात सुरू असलेल्या प्रभाग बैठकीमध्ये माजी मंत्री जयंत पाटील यांच्याबरोबर प्रतीक पाटील यांची उपस्थिती प्रामुख्याने दिसत आहे. मात्र, पालिकेच्या राजकारणात काही दिग्गज नेते प्रभाग बैठकीत अनुपस्थित असताना दिसत आहेत. हे दिग्गज नेते प्रभाग बैठकीत असो किंवा नसो याचा काहीही फरक पडत नाही तसेच विकासकाम करणारे जयंत पाटीलच आहेत असा सूर नागरिकांमधून येत आहे.
विकास आघाडीत वरून ऐकी दिसत असली तरी अंतर्गत मतभेद आहेत. माजी नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात कमळ घेऊन उतरण्याची चांगलीच तयारी सुरू केली आहे. त्यांनी आपले लक्ष इस्लामपूर, आष्टा पालिकेबरोबर इस्लामपूर विधानसभा मतदारसंघावर केंद्रित केले आहे. विकास आघाडीतील नेते सद्यातरी एकत्र दिसत नाहीत. त्यांच्यातील अंतर्गत मतभेद मिटविण्यासाठी कोणीतरी पुढाकार घेण्याची गरज आहे. त्यासाठी पुढाकार कोण घेणार? हा प्रश्‍न अनुत्तरीत आहे.
राज्यात भाजप-शिंदे सेनेची सत्ता असल्यामुळे शहरात विकास आघाडीतील नेते बिनधास्त असताना दिसत आहेत. माजी मंत्री जयंत पाटील यांना प्रभाग बैठकातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या प्रतिसादामुळे विकास आघाडीतील काही नेते अस्वस्थ झाले आहेत. गेले 60 महिन्यात जे जमले नाही ते आम्ही 6 महिन्यात करून दाखवले यावरून राष्ट्रवादी व विकास आघाडीमध्ये भविष्यात जुंपणार हे निश्‍चित.

COMMENTS