चंद्रमुखी फेम अमृता खानविलकर पहिल्यांदा ऐतिहासिक भूमिकेत

Homeताज्या बातम्यामनोरंजन

चंद्रमुखी फेम अमृता खानविलकर पहिल्यांदा ऐतिहासिक भूमिकेत

"हर हर महादेव"मधील पहिला लुक आला समोर

यंदाची दिवाळी प्रेक्षकांसाठी खास होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा शूरवीर मावळा बाजीप्रभू देशपांडे यांच्या पराक्रमाची गाथा सांगाणार हर हर

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी गेले अण्णा हजारेंच्या भेटीला…
शिकारीसाठी विनापरवाना प्रवेश; संशयितांकडून घोरपडीवर अत्याचार; अत्याचाराचा व्हिडीओ पाहून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे अधिकारी चक्रावले
आपल्या चॅनेलच्या माध्यमातून जाणून घेऊयात आजचे आपले राशीचक्र.

यंदाची दिवाळी प्रेक्षकांसाठी खास होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा शूरवीर मावळा बाजीप्रभू देशपांडे यांच्या पराक्रमाची गाथा सांगाणार हर हर महादेव हा सिनेमा येत्या 25 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. सिनेमात अभिनेता शरद केळकर बाजीप्रभूंच्या प्रमुख भूमिकेत आहेत. तर अभिनेता सुबोध भावे पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत आहे. सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. महाराष्ट्राला चंद्रा म्हणून वेड लावणारी अभिनेत्री अमृता खानविलकर सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहे. सोनाबाई देशपांडेंची भूमिका अमृता साकारणार आहे. सिनेमातील अमृताचा पहिला लुक समोर आला आहे.

COMMENTS