चक्क पोलिस कर्मचाऱ्याने लुटले तब्बल 24 तोळे सोनं आणि 8 लाख 40 हजार रुपये

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चक्क पोलिस कर्मचाऱ्याने लुटले तब्बल 24 तोळे सोनं आणि 8 लाख 40 हजार रुपये

औरंगाबाद पोलीस दलात खळबळ उडून देणारी धक्कादायक घटना

औरंगाबाद प्रतिनिधी - औरंगाबाद पोलीस दलात खळबळ उडून देणारी धक्कादायक घटना जिल्ह्यात समोर आली आहे. चक्क एका पोलीस कर्मचाऱ्याने सराफा व्यापाऱ्याला लुटण

रेल्वे स्थानकावर अचानक बेशुद्ध पडला तरुण… पोलिसाने दिले जीवदान (Video)
ऑन ड्युटी पोलिसांवर जीवघेणा हल्ला (Video)
जनतेच्या सुरक्षिततेसाठी सज्ज असणार्‍या पोलिस दलास कोरोना संरक्षणासाठी मास्क व सॅनीटायझरचे वाटप

औरंगाबाद प्रतिनिधी – औरंगाबाद पोलीस दलात खळबळ उडून देणारी धक्कादायक घटना जिल्ह्यात समोर आली आहे. चक्क एका पोलीस कर्मचाऱ्याने सराफा व्यापाऱ्याला लुटण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी औरंगाबाद शहर हद्दीतील सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात या कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष वाघ(Santhosh Vagh) असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून, तो औरंगाबाद ग्रामीण पोलिसात सोयगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. संतोष वाघ याने आपला मित्र रामचंद्र दहिवाळ याच्यासह सराफा व्यापाऱ्याला केंब्रिज चौकात अडवून पोलीस असल्याचा सांगत चौकशी करण्याच्या बहाण्याने अडवून तब्बल 24 तोळे सोनं आणि 8 लाख 40 हजार रुपये कॅश सराफा व्यापाऱ्याकडून लुटले. अशोक विसपुते असे सराफा व्यापाऱ्याचे नाव आहे. सराफा व्यापाऱ्याने पोलिसात धाव घेत याबाबत तक्रार दिली. यानंतर पोलिसांनी संतोष वाघच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून, त्याला एमआयडीसी सिडको पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

COMMENTS