पोलिस प्रशासनासह प्रसार माध्यमांनी दाखविली चुणूक;आंदोलनकर्त्यांनी मानले आभार !

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पोलिस प्रशासनासह प्रसार माध्यमांनी दाखविली चुणूक;आंदोलनकर्त्यांनी मानले आभार !

बीड (प्रतिनिधी) -  दिनांक ११ ऑक्टोबर सोमवार रोजी खासबाग-मोमीनपुरा जोडणाऱ्या नियोजित पुलाच्या निर्माणासाठी करण्यात आलेल्या लक्षवेधी डुबकी लगाव आंदो

रेल्वे स्थानकावर अचानक बेशुद्ध पडला तरुण… पोलिसाने दिले जीवदान (Video)
मुंबईतील पोलिसांंच्या 28 जानेवारीपर्यंत सुट्ट्या रद्द
कर्जत व पुणे पोलिसांची धडाकेबाज कारवाई : ६० लाखांची रोकड केली हस्तगत

बीड (प्रतिनिधी) – 

दिनांक ११ ऑक्टोबर सोमवार रोजी खासबाग-मोमीनपुरा जोडणाऱ्या नियोजित पुलाच्या निर्माणासाठी करण्यात आलेल्या लक्षवेधी डुबकी लगाव आंदोलनाची दखल घेऊन पोलीस प्रशासनाने केलेले चोख नियोजन आणि प्रसिद्धी माध्यमांनी व्यापक प्रमाणात नोंद घेत प्रसिद्ध केलेले वृत्तांकन यामुळे आंदोलनकर्त्यांनी पोलीस प्रशासनासह प्रसिद्धी माध्यमांचे जाहीर आभार मानून कृतज्ञता व्यक्त केली आहे. 

याविषयी दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे की, खासबाग-मोमीनपुरा या दोन भागातील रहिवाशांसाठीच नव्हे तर संपूर्ण बीड शहरवासीयांसाठी अत्यंत महत्त्वाचा व जिव्हाळ्याचा असणारा मधला मार्ग म्हणून बिंदुसरा नदीत नियोजित पुलाचे निर्माण कार्य होणे अत्यंत आवश्यक आहे परंतु शासन-प्रशासन दरबारी तोपर्यंत सूत्रे हालत नाही जोपर्यंत प्रश्नाची तीव्रता वाढविली जात नाही. यासाठी संविधानाने जनतेला दिलेला अधिकार म्हणजे लोकशाही मार्गाने आंदोलने करणे आणि करण्यात आलेल्या आंदोलनाला लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभाने अर्थातच वृत्तपत्रांनी नोंद घेऊन ठळक प्रसिद्धी देणे. 

जनतेकडून करण्यात आलेल्या आंदोलनांची दखल जेव्हा शासन-प्रशासन दरबारी युद्ध पातळीवर घेण्यात येते तेव्हा  जनतेकडून उचलण्यात आलेले प्रश्न मार्गी लागतातच ! हीच लोकशाहीची ताकद आहे. अशीच ताकद या खासबाग- मोमीनपुरा जोडणाऱ्या बिंदुसरा नदीवरील नियोजित पुलाच्या निर्माणासाठी करण्यात आलेल्या लक्षवेधी डुबकी लगाव आंदोलनात दिसून आली. बिंदुसरा नदीतून आजही मोठ्या प्रमाणात कमरेच्या वर पाणी वाहत आहे. याची जाण ठेवत पेठ बीड पोलिस ठाणे व शहर पोलीस ठाणे चे सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आंदोलनासाठी ज्याप्रमाणे नियोजन केले होते ते निश्चितच वाखाणण्याजोगे होते. 

नदीच्या दोन्ही किनारी पोलिसांचा मोठा लवाजमा आंदोलनाचे गांभीर्य दाखवत होता. त्यात आंदोलनस्थळी नदीपात्रात अग्निशामक दलाची गाडी व जवान लक्ष वेधून घेत होते. आंदोलनासह या सर्व नियोजनाची नोंद बीड जिल्ह्यातील  वृत्तपत्रांसह औरंगाबाद, जालना, पुणे येथील प्रसिद्धीमाध्यमांनी ही व्यापक प्रमाणात घेऊन बातमी प्रकाशित केली. सर्वांच्या योगदानामुळे बिंदुसरा नदीपात्रात पुलाच्या निर्माण कार्यास प्रत्यक्षात सुरुवात लवकरच होईल असे आशादायक चित्र निर्माण झाले आहे. 

आंदोलनाकरिता सर्वांकडून मिळालेल्या सहकार्यामुळे आंदोलनकर्ते तथा मुक्त पत्रकार एस.एम.युसूफ़, सय्यद इलयास, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे, ज्येष्ठ उद्योजक रमेशराव गंगाधरे, शेख युनूस चर्‍हाटकर, संदीप जाधव, इंजि. मुहम्मद मोईजोद्दीन, सय्यद आबेद यांनी पोलिस प्रशासनासह प्रसिद्धी माध्यमातील सर्व संपादक, पत्रकार, छायाचित्रकार आणि वृत्तपत्राशी संबंधित सर्वांचे जाहीर आभार मानून कृतज्ञता व्यक्त केली आहे.

COMMENTS