म्हाडा, आरोग्य व टिईटी प्रकरणाचा ‘ईडी’कडून होणार समांतर तपास

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

म्हाडा, आरोग्य व टिईटी प्रकरणाचा ‘ईडी’कडून होणार समांतर तपास

पुणे : पुणे पोलिसांच्या आर्थिक व गुन्हे शाखेने उघडकीस आणलेल्या म्हाडा, शिक्षक पात्रता परिक्षा (टिईटी) व आरोग्य विभाग परिक्षा घोटाळा प्रकरणाचा आता सक

अजित पवार गट लवकरच परत येणार
दहा दुचाकीसह पोलिसांनी एकाच्या मुसक्या आवळल्या,स्थागुशाची कारवाई
राष्ट्रीय अध्यक्ष ओबीसीच नेमावा लागेल! (काॅंग्रेसच्या अस्तित्वासाठी अनिर्वाय्य!)

पुणे : पुणे पोलिसांच्या आर्थिक व गुन्हे शाखेने उघडकीस आणलेल्या म्हाडा, शिक्षक पात्रता परिक्षा (टिईटी) व आरोग्य विभाग परिक्षा घोटाळा प्रकरणाचा आता सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) समांतर तपास केला जाणार आहे.

त्यादृष्टीने ईडी’कडून म्हाडा, आरोग्य विभाग व टिईटी’ प्रकरणासंबंधीची कागदपत्रे पुणे पोलिसांकडून मागविण्यात आली आहेत. आरोग्य विभागाच्या परिक्षेमध्ये गैरप्रकार केला जात असल्याच्या कारणावरुन पुणे पोलिसांच्या आर्थिक व सायबर गुन्हे शाखेच्या पथकाने तपास केला. त्यानंतर आरोग्य विभागाच्या परीक्षेतील घोटाळा उघडकीस आला, त्यापाठोपाठ पोलिसांनी म्हाडा व टिईटीमध्येही गैरप्रकार झाल्याचे उघड करीत त्यामध्ये कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार पुढे आणण्यात आला होता. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक व सायबर गुन्हे शाखेच्या पोलिस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांच्या पथकाने म्हाडा, आरोग्य व टिईटी प्रकरणाचा कसून शोध घेत तिन्ही क्षेत्रातील मोठ्या अधिकाऱ्यांना बेड्या ठोकत त्यांच्याकडून कोट्यावधी रुपये जप्त केले होते. दरम्यान, मागील वर्षभर या प्रकरणाची राज्याच्या वेगवेगळ्या भागात कारवाई सुरु होती.

COMMENTS