इमारतीचा स्लॅब कोसळून दुर्घटना.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

इमारतीचा स्लॅब कोसळून दुर्घटना.

दुर्घटनेत एक जण जखमी

नवी मुंबई प्रतिनिधी - नवी मुंबईतील सीवूड्स - दारावे सेक्टर 48 मध्ये गुरुकृपा सोसायटी मधील इमारतीचा स्लॅब कोसळल्याची घटना समोर आलेय. या दुर्घटनेत फ्

गुलाम नबी आझाद स्वगृही परतण्याचे संकेत
अवघ्या 6 महिन्यांच्या बाळाला हदयविकाराचा त्रास!
ज‍िल्हाध‍िकाऱ्यांची पद्मश्री राहीबाई सोमा पोपेरे यांच्या ‘बीज बँके’ला भेट

नवी मुंबई प्रतिनिधी – नवी मुंबईतील सीवूड्स – दारावे सेक्टर 48 मध्ये गुरुकृपा सोसायटी मधील इमारतीचा स्लॅब कोसळल्याची घटना समोर आलेय. या दुर्घटनेत फ्लॅट मध्ये राहणारे संजय पवार(Sanjay Pawar) जखमी झालेत. पहाटे गाढ झोपेत असताना फ्लॅट चा 40टक्के स्लॅब कोसळला असून यामध्ये जखमी संजय पवार यांच्या कानावर 8 टाके पडले आहेत. या घटनेमुळे सिडकोच्या मोडकळीस आलेल्या इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला असून या इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा करावा अशी मागणी रहिवाशांकडून करण्यात येत आहे.

COMMENTS