Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पाचगणी बसस्थानकात पुन्हा लाल परी प्रवाशांच्या सेवेत रुजू

कुडाळ / वार्ताहर : संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एसटी कर्मचार्‍यांनी शासन सेवेत विलगीकरण व्हावे याकरिता संप पुकारला होता. यास आज तब्बल पाच महिने उलटले

पहिल्या पावसातच फलटण बस स्थानक बनले पाण्याचे तळे
गौतम अदानींबाबत पंतप्रधानांनी उत्तर द्यावे : आ. पृथ्वीराज चव्हाण
बारावीतील विद्यार्थ्याची वाघोली येथे आत्महत्या

कुडाळ / वार्ताहर : संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एसटी कर्मचार्‍यांनी शासन सेवेत विलगीकरण व्हावे याकरिता संप पुकारला होता. यास आज तब्बल पाच महिने उलटले आहेत. या काळात एसटी बंद राहिल्याने कष्टकरी चाकरमान्यांची मोठी गैरसोय झाली. कारण पांचगणी या चाकरमान्यांच्या खर्‍या अर्थाने मिनी मुंबईचे आहे. पांचगणी हेच या चाकरमानी लोकांचे उद्योग नगरी आहे. मात्र, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असणारी लाल परी बंद असल्याने या कर्मचार्‍यांसाठी संध्याकाळी घरी जाताना खूप गैरसोय होत होती. घरी जाण्याकरिता त्यांना कामावरून लवकर सुट्टी घ्यावी लागत होती. उशीर झाल्यास खाजगी गाडी मिळत नसल्याने अनेक चालत घरी जावे लागले आहे.
खाजगी वाहतूक हीच या पाच महिन्याच्या कालावधीत कष्टकरी चाकरमान्यांची हक्काची सेवा होती. खाजगी वाहतूक करणार्‍या वाहतूकदारांनी या कष्टकरी लोकांना चांगली सेवा पुरवली होती. मात्र, संध्याकाळच्या वेळेस मात्र ही वाहतूक व्यवस्था कुचकामी ठरत होती. या चाकरमान्यांची गैरसोय होत होती. आता मात्र लालपरी सुरु झाल्याने या चाकरमान्यांची गैरसोय दूर झाली आहे.

COMMENTS