Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अजित पवारांना मिळणार अर्थखाते ?

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यात राष्ट्रवादी काँगे्रसमधील नेत्यांचा मंत्रिमंडळात समावेश करून एक आठवडा उलटला असला, तरी त्यांना अजूनही मंत्रिपदे देण्यात आ

पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादीचे पदाधिकारी अजित पवारांबरोबर
कंत्राटी डॉक्टरांच्या मानधनातातील वाढीसाठी प्रस्ताव तयार करा
उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळ स्पर्धेत सहभाग घ्यावा

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यात राष्ट्रवादी काँगे्रसमधील नेत्यांचा मंत्रिमंडळात समावेश करून एक आठवडा उलटला असला, तरी त्यांना अजूनही मंत्रिपदे देण्यात आलेली नाही. केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून, नंतर या मंत्र्यांना खाती मिळणार आहे. मात्र अर्थखाते पुन्हा एकदा अजित पवारांना मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
राज्यातील विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र या क्षेत्रातील औद्योगिक ग्राहकांना वीज दरात सवलत देण्यासाठी उपसमिती नेमून एक परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. या पत्रकावर उर्जा खाते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. तर सुधीर मुनगंटीवार (वने), उदय सामंत(उद्योग), अतुल सावे (सहकार) या मंत्र्यांची नावे आहेत. मात्र, (वित्त) खात्यावर कोणत्याही मंत्र्यांचे नाव नसल्याने हे खाते अजित पवार गटाकडे जाणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.  उद्योग, उर्जा आणि कामगार विभागाचे एक परिपत्रक राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. या परिपत्रकात देवेंद्र फडणवीस यांच्या नावापुढे (उर्जा) खाते लिहिले आहे. तर त्याच्याखाली (वित्त) खात्यापुढे कोणाचेही नाव नाही. मात्र, वित्त अर्थात अर्थ खाते हे अजित पवार गटाकडे जाणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. राज्य सरकाने राज्यातील विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र या भागातील औद्योगिक ग्राहकांना वीजदरात सवलत देण्याबाबत एक महत्वाचा निर्णय घेण्यासाठी उपसमिती नेमली आहे. या उपसमितीत शिंदे-फडणवीस सरकारच्या 5 मंत्र्यांची नावे लिहिण्यात आली आहे. या उपसमितीचे अध्यक्ष उर्जामंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. तर इतर सदस्यांची देखील नावे या उपसमितीत आहेत.

COMMENTS