HomeUncategorized

कराडला रिक्षा व्यावसायिकांचे आरटीओ कार्यालयासमोर धरणे आंदोलन

कराड / प्रतिनिधी : केंद्र व राज्य शासनाच्या वाढीव दंडामुळे रिक्षा व्यावसायिकाचे कंबरडे मोडले आहे. रिक्षावाल्यांचा आवाज दिल्लीपर्यंत जावा यासाठी आ

मुलाच्या प्रेमप्रकरणातून वडीलास झालेल्या मारहाणीत मृत्यू
जयंत कबड्डी प्रिमियर लीग’चे 20 फेब्रुवारी ला शुभारंभ; राष्ट्रीय कबड्डीपटू खंडेराव जाधव यांची माहिती
ढाकणी येथील कुस्ती मैदानात पै. गणेश कुंकुले याने पटकावली चांदीची गदा

कराड / प्रतिनिधी : केंद्र व राज्य शासनाच्या वाढीव दंडामुळे रिक्षा व्यावसायिकाचे कंबरडे मोडले आहे. रिक्षावाल्यांचा आवाज दिल्लीपर्यंत जावा यासाठी आज आंदोलन करण्यात आले आहे. केंद्र व राज्य शासनाने याची दखल घेवून तात्काळ दंडवाढ मागे घ्यावी, अशी मागणी अ‍ॅटो रिक्षा संघटना महासंघाच्यावतीने राज्य सल्लागार अशोकराव पाटील यांनी केली.
आरटीओ व पोलिसांची झालेली दंडवाढ रद्द करावी, या मागणीसाठी आज सोमवार, दि. 21 रोजी अ‍ॅटो रिक्षा संघटना महासंघाच्यावतीने कराड येथील आरटीओ कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात कराड-पाटण तालुक्यातील रिक्षा व्यावसायीक सहभागी झाले. यावेळी दंडवाढीविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर महासंघाच्या रिक्षा व्यावसायिकांच्यावतीने आरटीओ अधिकारी चैतन्य कणसे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
अशोकराव पाटील म्हणाले, अ‍ॅटो रिक्षा संघटना महासंघाच्या विद्यामाने कराड आरटीओ कार्यालयासमोर आज दंड वाढीविरोधात धरणे आंदोलन करण्यात आले. अनेकांनी रिक्षा व्यवसायासाठी बँकाची कर्जे घेतली आहेत. दोन वर्षात व्यवसाय न झाल्याने त्यांची कर्जे, व्याज थकली आहेत. आत्ता कुठेतरी व्यवसाय वळणावर येत असतानाच केंद्र व राज्य सरकारने मोठी दंडवाढ केली आहे. ती दरवाढ तात्काळ रद्द न केल्यास रिक्षावाल्यांना व्यवसाय करणे परवडणार नाही. याचा विचार करुन केंद्र व राज्य सरकारने दंडवाढ मागे घ्यावी. रिक्षावाल्यांचे कल्याणकारी मंडळ स्थापन करावे यासह अन्य मागण्या मान्य कराव्या. अन्यथा यापेक्षा उग्र आंदोलन करावे लागेल.

COMMENTS