HomeUncategorized

फलटण येथील बांधकाम व्यावसायिकावर खूनी हल्ला; राष्ट्रवादीच्या नगरसेवकासह अन्य एकावर गुन्हा

फलटण / प्रतिनिधी : पूर्ववैमनस्यातून बांधकाम व्यावसायिकावर चाकू हल्ला करुन त्यास गजाने मारहाण केल्याप्रकरणी अभिजित जानकर याच्यासह फलटण नगरपरिषदेचे

कृष्णा विश्‍व विद्यापीठाचा शुक्रवारी 11 वा दीक्षांत सोहळा
इराणच्या तेलसाठ्यांवर क्षेपणास्त्र हल्ला
त्र्यंबकेश्‍वरला आजपासून व्हीआयपी दर्शनाची सुविधा बंद

फलटण / प्रतिनिधी : पूर्ववैमनस्यातून बांधकाम व्यावसायिकावर चाकू हल्ला करुन त्यास गजाने मारहाण केल्याप्रकरणी अभिजित जानकर याच्यासह फलटण नगरपरिषदेचे नगरसेवक पांडुरंग गुंजवटे या दोघांविरोधात फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत फलटण शहर पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, की सागर सुधीर शहा (वय 36 रा. गोळीबार मैदान, फलटण) हे बांधकाम व्यावसायिक आहेत. गुरुवार, दि. 2 रोजी दुपारी दोनच्या सुमारास शहा हे फलटण नगरपरिषदेच्या पार्किंग गेटसमोर गाडी लावून चालले होते. त्यावेळी अभिजित जानकर (रा. शुक्रवार पेठ, फलटण) व नगरसेवक पांडुरंग गुंजवटे (रा. मलठण, फलटण) यांनी पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरुन शहा यांच्या हाताच्या दंडावर अभिजित जानकर याने धारदार शस्त्राने वार केला.
पांडुरंग गुंजवटे यांनी लोखंडी गजाने डोक्यात मारहाण करत शहा यांना गुजरांनो तुम्हाला मस्ती आली आहे, असे म्हणत शिवीगाळ केली. या हल्ल्यामध्ये सागर शहा जखमी झाले आहेत. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अभिजित जानकर व नगरसेवक पांडुरंग गुंजवटे यांच्याविरुध्द फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक कदम करत आहेत.

COMMENTS