ग्रामपंचायतींच्या रिक्त पावणेतीनशे जागांचा वाजला बिगुल…

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ग्रामपंचायतींच्या रिक्त पावणेतीनशे जागांचा वाजला बिगुल…

अहमदनगर/प्रतिनिधी : अहमदनगर जिल्हयातील 192 ग्रामपंचायतींमधील 274 रिक्त जागांसाठी पोटनिवडणुका 21 डिसेंबरला होणार आहेत. जिल्ह्यात सध्या नगर अर्बन बँकेस

रुग्णांचा तडपून तडपून मृत्यू, नातेवाईकांची ऑक्सिजनच्या सिलिंडर्सवर झुंबड | पहा ‘सकाळच्या बातम्या’ Lok News24
भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने ओबीसी समाजाच्या वतीने निदर्शने
आत्मकेंद्री लोकशाहीमुळे अनागोंदी व भ्रष्टाचार पोसला गेल्याचा आरोप

अहमदनगर/प्रतिनिधी : अहमदनगर जिल्हयातील 192 ग्रामपंचायतींमधील 274 रिक्त जागांसाठी पोटनिवडणुका 21 डिसेंबरला होणार आहेत. जिल्ह्यात सध्या नगर अर्बन बँकेसह तालुका कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांचे ढोल वाजत आहेत. त्यात आता गावपातळीवरील ग्रामपंचायतींच्या रिक्त जागांचाही बिगुल वाजला आहे.
सदस्याचे निधन, राजीनामा, अपात्रता वा इतर अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या ग्रामपंचायत सदस्य पदासाठी राज्यातील 4554 ग्रामपंचायतीमधील 7130 रिक्त जागांच्या पोट निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान घेण्यात येणार आहे. अहमदनगर जिल्हयातील 192 ग्रामपंचायतींमधील 274 रिक्त जागांचा यात समावेश आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरूंदकर यांनी दिली.
राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या ग्रामपंचायत पोटनिवडणुकांचे सर्व जिल्हाधिकार्‍यांना सूचना देणारे परिपत्रक नगरच्या उपजिल्हाधिकार्‍यांनी (महसूल) जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना पाठविले आहे. निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार तारीख निहाय निवडणूक कार्यक्रम घेण्यात येणार आहे. या निवडणुकांसाठी 30 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2021 या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करता येईल. 9 डिसेंबरला उमेदवारी अर्ज माघारी घेता येईल. 21 डिसेंबर रोजी मतदान व 22 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.
या निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने 12 नोव्हेंबर रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिध्द केली आहे. तर अंतिम मतदार यादी 18 नोव्हेंबरला प्रसिध्द केली आहे. सर्व जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी निवडणूक आयोगाच्या 17 नोव्हेंबर 2021 परिपत्रकातील सूचनांचे तंतोतत पालन करून हा पोटनिवडणुकांचा कार्यक्रम राबवावा. तसेच राज्य शासनाने दिलेल्या कोरोना नियमावलीचेही पालन करण्यात यावे, अशा सूचना राज्य निवडणूक आयोगाचे सचिव कुरूंदकर यांनी नमूद केल्या आहेत.

COMMENTS