रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाऊ निकाळजे यांचे नेवासाफाटा येथे शनिवारी आगमन

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाऊ निकाळजे यांचे नेवासाफाटा येथे शनिवारी आगमन

नेवासाफाटा(प्रतिनिधी) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए)चे राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाऊ निकाळजे यांचे नेवासाफाटा येथे आगमन होत असून शनिवारी ते कार्यकर्त्

कोतुळ शिक्षण संस्थेचे आज मंत्री आठवलेंच्या हस्ते उद्घाटन
श्री स्वामी समर्थ महाराज चरित्र | Shri Swami Samarth Maharaj | LokNews24 |
सार्वजनिक बांधकाम विभाग झाला भ्रष्टाचाराचा अड्डा l पहा LokNews24

नेवासाफाटा(प्रतिनिधी)

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए)चे राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाऊ निकाळजे यांचे नेवासाफाटा येथे आगमन होत असून शनिवारी ते कार्यकर्त्यांशी हितगुज करून मार्गदर्शन करणार आहे त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यानी तयारी सुरू केली असल्याचे रिपाई(ए)उत्तर जिल्हा कार्याध्यक्ष सुनील वाघमारे यांनी सांगितले.

यावेळी बोलतांना सुनील वाघमारे म्हणाले की राष्ट्रीय नेते असून दलित बांधवांसह सर्वसामान्य बहुजन समाज या संघटनेच्या माध्यमातून एकसंघ करण्याचे काम राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाऊ निकाळजे यांनी केले असून नेवासा फाटा येथील गोल्हार यांच्या साई दर्शन हॉटेल मध्ये ते थांबणार असून 

शनिवारी सकाळी ९ वाजता ते राजमुद्रा चौक राज मुद्रास,डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे अशोक चक्र स्थळास पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर चौक येथे पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करणार असून त्यानंतर हॉटेल साई दर्शन येथे पत्रकार परिषदेत आपली भूमिका ते स्पष्ट करणार आहे 

तेथून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून ते औरंगाबादकडे रवाना होणार असून दलित बहुजन फुले शाहू आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा कार्याध्यक्ष सुनील वाघमारे यांनी केले आहे.

COMMENTS