Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विशाखा साळुंखे हिला राष्ट्रीय क्रॉसकंट्री स्पर्धेत सांघिक सुवर्णपदक

सातारा / प्रतिनिधी : सातारा जिल्हा अ‍ॅमॅच्युअर अ‍ॅथलेटिक्स असोसिएशनची खेळाडू कु. विशाखा संजय साळुंखे (रा. मांढरदेव) हिने नुकत्याच कोहिमा (नागालँड

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत 82 हजार 435 शेतकर्‍यांना मिळणार लाभ
इस्लामपूर शहरातील 3 कोटी 45 लाखांच्या विकास कामांचे भूमिपूजन
कराड शहरात काही तासात 4 टन कचरा गोळा

सातारा / प्रतिनिधी : सातारा जिल्हा अ‍ॅमॅच्युअर अ‍ॅथलेटिक्स असोसिएशनची खेळाडू कु. विशाखा संजय साळुंखे (रा. मांढरदेव) हिने नुकत्याच कोहिमा (नागालँड) येथे झालेल्या राष्ट्रीय क्रॉसकंट्री स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करत 20 वर्षांखालील मुलींच्या गटात सांघिक सुवर्णपदक मिळवले. तिच्या या यशाबद्दल मार्गदर्शन करणारे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक राजगुरू कोचळे यांचा सत्कार संघटनेच्या रविवारी मळाई टॉवर कोल्हापूर नाका कराड येथे झालेल्या कार्यकारिणी सभेत सातारा जिल्हा अ‍ॅथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष पांडूरंग शिदे यांच्या हस्ते व उपाध्यक्ष अशोकराव थोरात, सचिव उत्तमराव माने, प्रा. राम कदम, संजय वाटेगांवकर, दिलीप चिंचकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी संघटनेचे सदस्य सचिन काळे, जयवंत पाटील, योगेश खराडे यांची उपस्थिती होती.
भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाने राष्ट्रीय क्रॉस कंट्री स्पर्धा व साऊथ एशियन क्रॉसकंट्री स्पर्धेचे आयोजन कोहिमा येथे केले होते. राष्ट्रीय स्पर्धेतील प्रथम चार खेळाडू सैफ एशियन स्पर्धेत सहभागी होतील, असे यावेळी जाहीर केले होते. यामध्ये विशाखा साळुंखे या संघटनेच्या गुणी खेळाडूने स्पर्धेत 20 वर्षांखालील मुलींच्या गटात 8 किलो मीटर धावणे या क्रीडा प्रकारात चतुर्थ क्रमांक मिळवला. त्यामुळे तिला सॅफ एशियन क्रॉसकंट्री स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. या स्पर्धेत भारताबरोबर श्रीलंका, नेपाळ बांगलादेश, मालदीव, भुटान या देशातील खेळाडूंनी सहभाग घेतला होता, असे प्रशिक्षक राजगुरू कोचळे यांनी सांगितले.
विशाखाच्या या यशाबद्दल सातारा जिल्हा अ‍ॅथलेटिक्स असोसिएशनच्या कार्यकारिणी सभेमध्ये संघटनेचे अध्यक्ष पांडुरंग शिंदे यांनी संघटनेच्या या गुणी खेळाडूचे कौतुक करीत खेळाडू व प्रशिक्षक यांच्या पाठीशी संघटना भक्कमपणे उभी राहील व सर्व प्रकारचे पाठबळ देईल. तसेच सातारा जिल्ह्यातील क्रीडाक्षेत्रातील खेळाडूंना येणार्‍या अडचणी दूर करण्यासाठी संटना सदैव खेळाडूंच्या पाठीशी उभी राहील, असे मत यावेळी व्यक्त केले.
उपाध्यक्ष अशोकराव थोरात यांनी संघटनेने महाराष्ट्राला आजपर्यत अनेक नावाजलेले खेळाडू दिले आहे. विशाखाच्या रूपाने संघटनेच्या कष्टाचे फळ म्हणून छोट्याशा गावातून येऊन आपले मार्गदर्शक व स्वतःच्या मेहनतीवर खेळाडू यश मिळवत आहेत. जिल्हा संघटनेच्या आजपर्यतच्या लौकिकास साजेशी कामगिरी करीत याचा संघटनेला अभिमान आहे, असे मत यावेळी व्यक्त केले.

COMMENTS