सातारा / प्रतिनिधी : झाडांना व इमारतींना निर्बंध घालता मग विमानतळाच्या आजूबाजूच्या डोंगर टेकडीचे काय करणार? शेती ही राष्ट्रीय संपत्ती असून,
सातारा / प्रतिनिधी : झाडांना व इमारतींना निर्बंध घालता मग विमानतळाच्या आजूबाजूच्या डोंगर टेकडीचे काय करणार? शेती ही राष्ट्रीय संपत्ती असून, वर्षातून आठ-दहा वेळा उतरणार्या विमानासाठी शेकडो एकर जमीन नापिक होऊन पडून राहात आहे. त्यामुळे विमानतळ विस्तारवाढ करण्यापेक्षा विमानतळाची जागा संबंधित शेतकर्यांना परत करावी, अशी मागणी डॉ. भारत पाटणकर यांनी केली.
जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नुकत्याच मिळालेल्या इमारत बांधकाम व झाडे लावण्यासंदर्भातील निर्बंधांच्या नोटिशीच्या अनुषंगाने हा मेळावा घेण्यात आला. यावेळी पंजाबराव पाटील, भगवानराव पाटील, सिध्देश्वर पाटील, शिवाजीराव शिंदे, अशोकराव शिंदे, हरिश्चंद्र पाटील आदींसह वारुंजी, केसे, मुंढे, पाडळी, गोटेतील बाधित उपस्थित होते.
विमानतळापासून वीस किलोमीटर परीघ क्षेत्रामध्ये शासनाने घातलेल्या इमारती व झाडांच्या उंचीच्या निर्बंधासंदर्भात डॉ. पाटणकर म्हणाले, विमानतळ विस्तारवाढ हा विषय कायमस्वरूपी संपवून विमानतळ रद्द झाल्याचे जाहीर करावे. झाडांना व इमारतींना निर्बंध घालता मग विमानतळाच्या आजूबाजूच्या डोंगर टेकडीचे काय करणार? वाढीव विमानतळ करण्यापेक्षा विमानतळाची जागा संबंधित शेतकर्यांना परत करावी. अलिबाग येथील रिलायन्स कंपनीला देण्यात येणारी तीन हजार एकर जमीन एकत्रित लढ्यामुळे शासनाला पुन्हा शेतकर्यांना परत करावी लागली. तुम्ही जोपर्यंत शासनाकडून पैसे घेत नाही आणि शासन जोपर्यंत तुमच्या जमिनीचा कब्जा घ्यायला येत नाही. तोपर्यंत तुमच्या जमिनी सुरक्षित आहेत. या जमिनीवर बँका कशा कर्ज देत नाहीत ते आपण पाहू, असेही त्यांनी सांगितले.
याप्रसंगी पंजाबराव पाटील, शिवाजीराव शिंदे, बबनराव पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. सिध्देश्वर पाटील यांनी प्रास्ताविक केले. सचिव गावडे यांनी आभार मानले.
COMMENTS