प्रतिनिधी खरवंडी कासार राष्ट्रीय महामार्ग कल्याण विशाखापटणम वर फुंदे टाकळी येथे खराब रस्त्यामुळे टॅकर पलटी झाल्याने रस्ता बंद होऊन वाहनाच्या ला
प्रतिनिधी खरवंडी कासार
राष्ट्रीय महामार्ग कल्याण विशाखापटणम वर फुंदे टाकळी येथे खराब रस्त्यामुळे टॅकर पलटी झाल्याने रस्ता बंद होऊन वाहनाच्या लागल्या रांगा लागल्या होत्या त्यातच वारंवारं मागणी व पाठपुरावा करूनही रस्त्याचे काम होत नसल्याने अपघात होत आहेत अधीकारी वर्गाचे दुर्लक्ष आहे राष्ट्रीय महामार्गाचे अधीकारी आल्याशिवाय वाहतुक सुरू करू देणार नाही ग्रामस्थानी भुमीका घेतल्याने व लवकर अधीकारी घटनास्थळी न आल्याने राष्ट्रीय महामार्गावर दुपार पर्यंत वाहनाच्या लांब रांगा लागल्या होत्या या खराब रस्त्यावर चुक नसतानाही निष्पाप लोकाचे अनेक अपघातामध्ये जिव गेले आहेत तरीही अधीकारी व लोकप्रतीनिधीचे दुर्लक्ष आहे त्यामुळे फुंदे टाकळी चे सरपंच प्रविण फुंदे भागीनाथ फुंदे गोकुळ फुंदे राहुल फुंदे श्रीराम फुंदे यांनी अपघात स्थळी ठिय्या देत राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या आभियंत्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली
पोलीस निरिक्षक सुहास चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेत वाहतुक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला व सतंप्त ग्रामस्थाचे म्हणने ऐकले राष्ट्रीय महामार्गाच्या कर्मचाऱ्यानी तात्तपुरते खड्डे बुजवण्याचे अश्वासन दिल्याने सतंप्त ग्रामस्थ शांत झाले
कल्याण-विशाखापट्टणम हा राष्ट्रीय महामार्ग पुर्वीचा क्रमांक ( २२२ ) नवा क्रमांक ६१ हा मृत्यूचा सापळा बनला असून पाथर्डी ते फुंदेटाकळी व पाथर्डी ते मेहेकरी अहमदनगर पर्यंत अशा ५८ कि मी लांबीच्या रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असून काही ठिकाणी धिम्या गतीने चालु आहे रस्त्यावर सहा फुटांचे खड्डे पडले आहेत त्यातच गेल्या एक महिन्यापासून पाऊस सुरू असल्याने रस्ता पूर्णपणे उखडला गेला आहे तर काही ठिकाणी पुल अर्धवट बांधकाम अवस्थेत आहेत दर दोन दिवसानंतर या राष्ट्रीय महामार्गावर अपघात होत आहेत गेल्या पाच वर्षापासून कल्याण-विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असून पुणे येथील आरवायके व जी डी सी एल कंपनी यांनी दोन वर्ष या महामार्गाचे काम केले तेही वेळेत व दर्जेदार झाले नाही त्यामुळे त्यांचे कंत्राट रद्द करून आता सोलापूर येथील इंगोले कंट्रक्शन ला काम दिले गेले आहे तरीसुद्धा काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने अपघातात निष्पाप नागरिकांचा बळी जात असल्याने फुंदेटाकळी ग्रामस्थांनी अपघात स्थळीच ठिय्या आंदोलन करत पाच तास राष्ट्रीय महामार्ग बंद ठेवला तसेच स्थानिक आमदार व खासदार यांनी कल्याण-विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गाचे ठेकेदाराकडून कमिशन घेतल्याने राष्ट्रीय महामार्ग पूर्ण होत नसल्याचा आमदार राजळे व खासदार विखे यांचा नामोल्लेख टाळत आरोप केला
चौकट
म्हणुन झाले ग्रामस्थ सतंप्त
फुंदे टाकळी येथे चारच दिवसा पुर्वी या मार्गावर खडयात वृक्षारोपन करून ग्रामस्थांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे लक्ष वेधले होते खड्डे बुजवण्याचे अश्वासण अधिकाऱ्यांनी दिले मात्र खड्डे बुजवले नाही व त्यामुळे एकाच खडयात १२ तासात एकाच जागेवर चार वाहने पलटली टॅम्पो छोटा हत्ती व पिकअप या ठिकाणी पलटी झाले छोटे वाहन असल्याने ग्रामस्थानी मदत केली रस्ता खुला झाला मात्र रात्री मोठे कन्टेनर टॅकर पलटी झाल्याने रस्ता बंद झाला तरी वाहनाच्या रांगा लागल्या तरी या विभागाचा अधिकारी वा कर्मचारी घटनास्थळी न आल्याने ग्रामस्थ व वाहन धारक सतंप्त झाले होते
COMMENTS