बेलापूरकरांनी केलेल्या कौतुकामुळे आम्हालाही काम करण्यास निश्चितच ऊर्जा मिळेल; अप्पर पोलीस अधिक्षक दिपाली काळे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बेलापूरकरांनी केलेल्या कौतुकामुळे आम्हालाही काम करण्यास निश्चितच ऊर्जा मिळेल; अप्पर पोलीस अधिक्षक दिपाली काळे

बेलापुर (प्रतिनिधी) -  गुन्ह्याचा तपास लवकर लागावा, ही नागरीकांची अपेक्षा रास्त आहे. परंतु आम्ही काही जादुगार नाही. आपण दिलेल्या माहीती व मदतीमुळे

साहित्य, वाचन संस्कृती व संवर्धनासाठी ग्रंथ भेट
पोलिसांत गुन्हा दाखल झाल्याने मुन्नाभाई फरार
कोरोना नियंत्रणासाठी नागरिकांनी नियमित मास्क वापरावे : पोलिस निरीक्षक जाधव

बेलापुर (प्रतिनिधी) – 

गुन्ह्याचा तपास लवकर लागावा, ही नागरीकांची अपेक्षा रास्त आहे. परंतु आम्ही काही जादुगार नाही. आपण दिलेल्या माहीती व मदतीमुळेच आम्ही सर्व गुन्ह्यांची उकल करु शकलो बेलापूरकरांनी केलेल्या कौतुकामुळे आम्हालाही काम करण्यास निश्चितच ऊर्जा मिळेल, असे मत अप्पर पोलीस अधिक्षक दिपाली काळे यांनी व्यक्त केले. 

बेलापुर परिसरात काही दिवसापासुन दरोड्याचे सत्र सुरु झाले होते. चोरट्यांनी आगोदर प्रा.सदाफुले यांच्या घरावर दरोडा टाकला. त्यानंतर उदय खंडागळे व भगीरथ चिंतामणी यांच्या घरावर दरोडा टाकला. या घटनेमुळे वाड्या-वस्त्यांवरील नागरिकांत भितीचे वातावरण तयार झाले. परंतु पोलीसांनी सर्व गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या त्याबद्दल बेलापुर ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य शरद नवले हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून अप्पर पोलीस अधिक्षक दिपाली काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके, गुन्हा अन्वेषण विभागाचे प्रमुख पोलीस निरीक्षक अनिल कटके, श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय सानप, पोलीस उपनिरीक्षक कृष्णा घायवट उपस्थित होते. यावेळी बोलताना अप्पर पोलीस दिपाली काळे पुढे म्हणाल्या की, बेलापुर गावाचा इतिहास फार मोठा आहे. पोलिसांच्या पाठीवर शाबासकीची थाप ही बेलापूरकरच देवु शकतात, असेही त्या म्हणाल्या. यावेळी सत्काराला उत्तर देताना उपविभागीय अधिकारी संदीप मिटके म्हणाले की, मी यापूर्वीही तालुक्यात काम केलेले होते. परंतु त्यावेळी मी पुन्हा येईल मी पुन्हा येईल असे म्हणालो नसलो तरी या तालुक्यात पुन्हा आलो आहे. आपल्या सर्वांच्या मदतीने पोलिसांनी दरोड्यातील आरोपींना जेरबंद केले. दरोड्याच्या तपासाकरीता आंदोलन, रस्तारोको, गाव बंद आंदोलने झाली असती तर व्यवस्थित तपास करता आला नसता. ग्रामस्थांनी वेळोवेळी गाव बंद ठेवण्याचा प्रयत्न करु नये. व्यापाऱ्यांनी विनाकारण बंद करणारा विषयी तक्रार केल्यास निश्चितच कठोर कारवाई करु. कुठल्याही घटनेला बंद, रस्तारोको हा पर्याय असु शकत नाही, असेही ते म्हणाले. एलसीबीचे पोलीस निरीक्षक अनिल कटके म्हणाले की, आम्ही आमचे कर्तव्य केले त्याबद्दल आपण केलेल्या सत्कारामुळे काम करण्यास प्रोत्साहन मिळेल. यावेळी जि. प. सदस्य  शरद नवले, रणजीत श्रीगोड, माजी सरपंच भरत साळूंके, ईस्माईल शेख, सरपंच महेंद्र साळवी आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी अप्पर पोलीस अधिक्षक दिपाली काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके, एलसीबीचे पोलीस निरीक्षक अनिल कटके, श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय सानप, पोलीस उपनिरीक्षक कृष्णा घायवट, हवालदार अतुल लोटके, राजेंद्र आरोळे, सुरेश औटी, शंकर चौधरी, रामेश्वर ढोकणे, गणेश भिंगारदे, निखील तमनर, पोपट भोईटे, हरिष पानसंबळ, नितीन भालेराव, नितीन चव्हाण, नितीन शिरसाठ, सुनिल दिघे, किशोर जाधव, पंकज गोसावी, राहुल नरवडे आदि पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचा ग्रंथ व शाल देवुन सन्मान करण्यात आला. सुवर्णकार समाजाच्या वतीने अनिल मुंडलीक यांनी पोलीस अधिकाऱ्यांचा सन्मान केला. यावेळी बेलापुर पत्रकार संघाचे अध्यक्ष भास्कर खंडागळे, सुवालाल लुक्कड, कैलास चायल, प्रकाश नवले, भास्कर बंगाळ, प्रभाकर कु-हे, शांतीलाल हिरण, प्रशांत लढ्ढा, बाबुलाल पठाण, रावसाहेब अमोलीक, गोरख कुताळ, प्रशांत मुंडलीक, बाळासाहेब दाणी, महेश कुऱ्हे,  प्रकाश कुऱ्हे, दादासाहेब कुताळ, विशाल वर्मा, गणेश बंगाळ, ग्रामपंचायत सदस्य मुस्ताक शेख, रमेश अमोलीक, मोहसीन सय्यद, नितीन नवले, शफीक आतार, रामेश्वर सोमाणी, श्रीहरी बारहाते, महेश कु-हे,जाकीर हसन शेख,जिना शेख, संजय रासकर, अजीज शेख, मोहन सोमाणी, विशाल आंबेकर, शोएब शेख, गणेश बंगाळ, गोरख कुताळ, अकिल जहागिरदार, नंदु खंडागळे, तस्वर बागवान, दिपक निंबाळकर, प्रभात कुऱ्हे, कुंदन कुताळ, अजीज शेख, बाळासाहेब शेलार, समीर जहागिरदार, नितीन नवले, अन्वर बागवान, पत्रकार असलम बिनसाद, सुहास शेलार, किशोर कदम, दिलीप दायमा, अशोक शेलार, कासम शेख, मुसा सय्यद, सचिन वाघ, दिपक क्षत्रीय, शफीक बागवान आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी केले, तर सूत्रसंचलन पत्रकार देविदास देसाई यांनी केले. तंटामूक्ती अध्यक्ष पुरुषोत्तम भराटे यांनी आभार मानले.

COMMENTS