विद्यार्थी प्रगत तर राष्ट्र प्रगत: महापौर रोहिणी ताई शेंडगे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विद्यार्थी प्रगत तर राष्ट्र प्रगत: महापौर रोहिणी ताई शेंडगे

नगर प्रतिनिधी :  विद्यार्थी प्रगत झाल्यावर आपले राष्ट्र प्रगत होण्यास मदत होणार आहे. कोरोणाच्या महाभयंकर संकट काळामध्ये माणूस माणसापासून लांब गेला

‘वाराई’च्या प्रश्नासंदर्भात व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करू नये : जिल्हाधिकाऱ्यांचे व्यापाऱ्यांना आश्वासन
खा. विखेंनी ‘अर्बन’ ची निवडणुक टाळण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावावी- सुधीर मेहता
उड्डाणपुलाच्या कामासाठी शासकीय जमीन कमी संपादन करत खाजगी जमीन जास्त संपादन करत असल्याचा आरोप

नगर प्रतिनिधी : 

विद्यार्थी प्रगत झाल्यावर आपले राष्ट्र प्रगत होण्यास मदत होणार आहे. कोरोणाच्या महाभयंकर संकट काळामध्ये माणूस माणसापासून लांब गेला. दीड वर्षांमध्ये कोरोना मुळे शिक्षण क्षेत्रातचे मोठे नुकसान झाले आहे. परंतु सावेडीतील सखाराम मेहेत्रे प्राथमिक विद्यालयने घरोघरी शाळा हा उपक्रम सुरू करून विद्यार्थ्यांना ज्ञानदान करण्याचे काम केले आहे. काही विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीमुळे ऑनलाइन शिक्षण घेता येत नाही. परंतु या शाळेच्या शिक्षिका मनीषा बनकर, संगीता बनकर, सुरेखा गर्जे, मनीषा कदम या शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन घरोघरी शाळा हा उपक्रम यशस्वीपणे राबवला आहे. हा कौतुकास्पद असून इतर शाळांनीही हा उपक्रम राबवला पाहिजे असे प्रतिपादन महापौर रोहिणी ताई शेंडगे यांनी केले.

     सावेडी येथील सखाराम मेहेत्रे प्राथमिक विद्यालयने घरोघरी शाळा उपक्रमाचे उद्घाटन महापौर रोहिणीताई शेंडगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मनपा शिक्षण मंडाळेचे पर्यवेक्षक जुबेर पठाण, केंद्र समन्वयक अरुण पालवे, संस्थेचे सचिव नामदेव गाडिलकर, मुख्याध्यापक बाबासाहेब शिंदे, मुख्याध्यापिका मनीषा बनकर, मुख्याध्यापिका अनिता काळे, अजित बोराटे,महेंद्र कदम,संदीप आंधळे, उपक्रम कत्या मनीषा बनकर, संगीता बनकर सुरेखा गर्जे, मनीषा कदम आदी विद्यार्थी व पालक उपस्थित होते. 

       संस्थेचे सचिव नामदेव गाडिलकर म्हणाले की कोरोणा च्या काळामुळे दोन वर्ष झाली शाळा बंद आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे आतूनात शैक्षणिक नुकसान झाले आहे. ऑनलाइन शिक्षण पद्धत चालू आहे. परंतु विविध अडचणी निर्माण होतात. काही विद्यार्थ्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे ऑनलाइन  शिक्षण घेता येत नाही. संस्थेने सकारात्मक दृष्टिकोनातून सामाजिक बांधिलकी जोपासत शिक्षकांनी घरोघरी जाऊन विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे काम केले आहे. विद्यार्थी हा शिक्षणाचा संपर्कात आल्याशिवाय योग्य ते संस्कार होऊ शकत नाही. यासाठी शिक्षणाबरोबर संस्काराचे ही धडे गिरवले जात आहे. संघर्षमय जीवन जगत असताना आपण सर्वजण कोरोणाचा सामना करत आहे. या काळामध्ये पहिली ते सातवीचे वर्ग अजुन किती दिवस बंद राहतील हे सांगता येणार नाही. यासाठी आमच्या विद्यालयाने घरोघरी शाळा‌ हा उपक्रम सुरु केला आहे‌. याचा लाभ विद्यार्थ्यांना होत आहे असे ते म्हणाले.

        शिक्षिका संगीता बनकर म्हणाले की आम्ही सर्व शिक्षिका घरोघरी शाळा  या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन  ज्ञानदानाचे काम करीत आहे.  स्वाध्याय तयार करून मुलांपर्यंत पोहोच केली. व त्याचा अभ्यास घेतला याच बरोबर नवीन नवीन संकल्पना तयार करून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे काम करत आहोत. दिवसंदिवस शिक्षणामध्ये अमुलाग्र बदल होत आहे. ही शिक्षणाची चळवळ कोरोना काळात विद्यार्थ्यांपर्यंत पोचवण्याचे काम करत आहोत. सातारा येथील संजय खरात या शिक्षकाने कोरोणा काळात घरोघरी जाऊन विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे काम केले. त्यांची संकल्पना आम्ही नगर शहरामध्ये राबवित आहोत. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे कृती आराखडा तयार करून विद्यार्थ्यांना शिकवण्याचे काम केले जाते. चांगला आणि निकोप समाज घडवण्यासाठी शिक्षण महत्त्वाचे आहे. शिक्षणामध्ये खंड पडू नये यासाठी आमच्या संस्थेने घरोघरी शाळा हा उपक्रम राबवला आहे. या उपक्रमामध्ये विद्यार्थी व पालक समाधान व्यक्त करीत आहे असे ते म्हणाले. मनपा शिक्षण मंडळाचे पर्यवेक्षक जुबेर पठाण व केंद्र समन्वयक अरुण पालवे यांनी घरोघरी शाळा या उपक्रमाचे कौतुक केले.

COMMENTS