सिद्धिविनायक मंदिरातील कथित 18 कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांवर न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकर यांनी सविस्तर स्पष्टीकरण दिलं आहे.सरवण

सिद्धिविनायक मंदिरातील कथित 18 कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांवर न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकर यांनी सविस्तर स्पष्टीकरण दिलं आहे.सरवणकर म्हणाले, मंदिरात दरवर्षी 18 कोटींची चोरी झाल्याचा उल्लेख संबंधित पत्रात नाही. मात्र, काही अनियमितता आढळल्यानंतर प्रशासनाने तातडीने कारवाई केली.दर्शनासाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून GPay द्वारे पैसे घेतले जात असल्याचं उघड झाल्यानंतर 19 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आणि त्यांच्याकडून शपथपत्रही घेण्यात आलं, अशी माहिती त्यांनी दिली.याशिवाय काही कर्मचाऱ्यांकडून हातचलाखीने पैसे काढले जात असल्याचं समोर आल्यानंतर 9 जणांवरही कारवाई करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.मंदिरातील पारदर्शकता वाढवण्यासाठी केलेल्या उपाययोजनांमुळे दानपेटीतील मासिक देणगी 40 ते 45 लाखांवरून जवळपास 90 ते 98 लाख रुपयांपर्यंत वाढल्याचा दावाही सदा सरवणकर यांनी केला.

COMMENTS