मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माफीनाम्याच्या वक्तव्यावरून जोरदार टीका केली आहे."ज्यांनी ट्रोलिंग केलं त्यांना मी मा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माफीनाम्याच्या वक्तव्यावरून जोरदार टीका केली आहे.”ज्यांनी ट्रोलिंग केलं त्यांना मी माफ करतो, असं मोदी म्हणतात. पण NEET पेपरफुटीमुळे ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, त्यांच्या आई-वडिलांची माफी कोण मागणार?” असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला.विद्यार्थ्यांच्या समस्या, बेरोजगारी आणि परदेशात जाणाऱ्या तरुणांच्या वाढत्या संख्येवरूनही त्यांनी सरकारला घेरलं. देशातील वातावरणामुळे तरुणांमध्ये अस्वस्थता वाढत असल्याचं ते म्हणाले.यावेळी राज ठाकरे यांनी उद्योगपतींचं देश सोडून जाणं, राम मंदिरातील चोरी आणि तरुणांच्या प्रश्नांवरूनही केंद्र सरकारवर निशाणा साधला.”तरुणांना धर्मांध बनवू नका, त्यांना शिक्षण आणि रोजगाराच्या मार्गावर आणा,” असं आवाहनही राज ठाकरेंनी केलं.

COMMENTS