Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्री संभुआप्पा बुवाफनची यात्रा कार्तिक पौर्णिमेपासून : मठाधिपती मिलिंद मठकरी

इस्लामपूर / प्रतिनिधी : गेली दोन वर्षे कोरोनाच्या महामारीमुळे यात्रा भरवण्यात आली नव्हती नाही. सध्या कोरोनाचे सावट कमी झाल्याने यावर्षीची यात्रा

माध्यमे समाजासह राज्यकर्त्यांना दिशादर्शक : ना. चंद्रकांत पाटील
सैन्य भरतीसाठी घेतलेले पैसे परत देण्यास टाळाटाळ; युवकाचे अपहरण
विधान परिषदेत निशिकांत पाटील यांची वर्णी लागणार….?

इस्लामपूर / प्रतिनिधी : गेली दोन वर्षे कोरोनाच्या महामारीमुळे यात्रा भरवण्यात आली नव्हती नाही. सध्या कोरोनाचे सावट कमी झाल्याने यावर्षीची यात्रा मोठ्या उत्साहात होणार आहे. हिंदु-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेले ग्रामदैवत श्री संभुआप्पा बुवाफनची यात्रा कार्तिक पौर्णिमेला म्हणजे 8 नोव्हेंबर रोजी सुरू होणार असल्याची माहिती पोलीस पाटील बाळासाहेब पाटील व मठाधिपती मिलिंद मठकरी यांनी दिली.
पोलीस पाटील म्हणाले, कोरोनामुळे गेली दोन वर्षे संभुआप्पा बुवाफन यात्रा भरलेली नाही. सध्या कोरोनाचे सावट संपत आले आहे त्यामुळे यावर्षी ही यात्रा मोठ्या प्रमाणात भरणार आहे. या यात्रेनिमित्त शुक्रवार, दि. 4 ऑक्टोंबर रोजी मंडप चढवला जाणार आहे. 4 ते 8 आक्टोंबरपर्यंत रोजे-उपवास आहेत. रविवार, दि. 6 ते 8 ऑक्टोंबर दरम्यान फकीर होण्याचा कार्यक्रम होणार आहे. सोमवार, दि. 7 रोजी गंधल रात्र मंगळवार, दि. 8 ऑक्टोंबर हा यात्रेचा मुख्य दिवस आहे. या दिवशी फकीर पूजन केले जाणार आहे.
या यात्रेनिमित्त मंगळवार, दि. 8 रोजी एकतारी भजन, शाहीर आदिनाथ व प्रसाद विभूते यांचा पोवाड्याचा कार्यक्रम, बुधवार, दि. 9 ऑक्टोंबर रोजी शाहीर देवानंद माळी यांचा पोवाडाचा कार्यक्रम तसेच गुरुवार, दि. 10 ऑक्टोंबर रोजी कलाविश्‍व नृत्यसंस्कार अ‍ॅकॅडमी प्रस्तुत उत्सव मराठी संस्कृतीचा हा पारंपारिक नृत्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे. शुक्रवार, दि. 11 रोजी कव्वाली पार्टी तर शनिवार, दि. 12 रोजी चैत्राली प्रस्तूत स्वरगंधार मराठी हिंदी गीतांचा कार्यक्रम होणार आहे. यात्रेदरम्यान 10, 13, 17, 20 या तारखेला आठवडी बाजार हे मंदिराबाहेर भरणार असल्याची माहिती पोलीस पाटील बाळासाहेब पाटील व मठाधिपती मिलिंद मठकरी यांनी दिली.

COMMENTS