Homeताज्या बातम्या

’ऑपरेशन ’यात्री सुरक्षा’ला यश; दोन मोबाईल चोर अटकेत, 14 चोरीचे मोबाईल जप्त

नांदेड : रेल्वे प्रवाशांच्या मालमत्तेच्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ’ऑपरेशन यात्री सुरक्षा’ अंतर्गत रेल्वे सुरक्षा

गेवराईत वेश्या व्यवसायावर पोलिसांचा धडक छापा; तीन पीडित महिलांची सुटका, दोन महिलांविरुद्ध गुन्हागुप्त माहितीच्या आधारे एएचटीयू ची कारवाई; डमी ग्राहकाच्या मदतीने उघड झाला प्रकार
मुंबई विमानतळावरून 5 कोटीचे सोने जप्तराजकीय पदाधिकार्‍यासह पाच जण ताब्यर्चीं
मुंबई, पुणे व नागपूरातील कार्यालयांना स्फोटाची धमकीमहापौर कार्यालयासह आरएसएसच्या मुख्यालयाचा समावेश
Gang selling stolen mobile phones in Tamil Nadu, Kerala busted


नांदेड : रेल्वे प्रवाशांच्या मालमत्तेच्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ’ऑपरेशन यात्री सुरक्षा’ अंतर्गत रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) नांदेड विभागाने दोन स्वतंत्र कारवायांमध्ये दोन आरोपींना अटक करून 3 लाख 69 हजार रुपये किमतीचे 14 चोरीचे मोबाईल फोन जप्त केले आहेत.वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त दीप चंद्र आर्य यांच्या मार्गदर्शनाखाली मोबाईल चोरी आणि प्रवासी मालमत्ता चोरी (ढेझइ) रोखण्यासाठी विशेष पथक स्थापन करण्यात आले आहे. या पथकाने शासकीय रेल्वे पोलीस (जीआरपी) यांच्या समन्वयाने यशस्वी कारवाया केल्या. पहिल्या कारवाईत छत्रपती संभाजीनगर येथे सीआयबी, विभागीय विशेष पथक आणि जीआरपीच्या संयुक्त पथकाने कुंदन कलानी (वय 19) याला अटक केली. त्याच्या ताब्यातून 3 लाख 49 हजार रुपये किमतीचे 13 चोरीचे मोबाईल जप्त करण्यात आले. दुसर्‍या कारवाईत नांदेड रेल्वे स्थानकावर अनिकेत मगरे (वय 21) याला अटक करून त्याच्याकडून 20 हजार रुपये किमतीचा रिअलमी कंपनीचा चोरीचा मोबाईल जप्त करण्यात आला. दोन्ही आरोपींना पुढील तपासासाठी संबंधित जीआरपीच्या ताब्यात देण्यात आले आहे. या कारवाया गुप्त माहिती, प्रभावी तपास आणि आरपीएफ-जीआरपी यांच्या समन्वयातून यशस्वी झाल्याचे सांगण्यात आले. प्रवाशांनी मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी तसेच संशयास्पद हालचाल किंवा चोरीची घटना आढळल्यास तात्काळ रेल मदत हेल्पलाइन 139 किंवा जवळच्या आरपीएफ/जीआरपी चौकीशी संपर्क साधावा, असे आवाहन आरपीएफने केले आहे.

COMMENTS