Homeताज्या बातम्या

संरक्षण मंत्र्यांसमोर अहिल्यानगरच्या विकासाचा अजेंडाखासदार नीलेश लंके यांनी घेतली राजनाथ सिंह यांची भेट

अहिल्यानगर : अहिल्यानगरच्या ऐतिहासिक वारशाचे संवर्धन, संरक्षण संशोधन क्षेत्राचे बळकटीकरण आणि सैन्य हद्दीलगतच्या गावांतील नागरिकांच्या प्रलंबित प्

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त बेलापूरमध्ये रक्तदान शिबीर उत्साहात पारदर्शक
हॉटेलवर छापा; चार पीडित महिलांची सुटका; जातेगाव शिवारात कारवाई; दोन आरोपी ताब्यात
शेवगावमध्ये सागवान लाकडाची अवैध वाहतूकवन विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह?

अहिल्यानगर : अहिल्यानगरच्या ऐतिहासिक वारशाचे संवर्धन, संरक्षण संशोधन क्षेत्राचे बळकटीकरण आणि सैन्य हद्दीलगतच्या गावांतील नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांच्या अनुषंगाने खासदार नीलेश लंके यांनी गुरुवारी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची नवी दिल्लीत भेट घेतली. यावेळी त्यांनी तीन स्वतंत्र निवेदने सादर करून विविध विषयांवर केंद्र सरकारच्या तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी केली.खासदार लंके यांनी स्वदेश दर्शन २.० योजनेंतर्गत मंजूर झालेल्या २४.९९ कोटी रुपयांच्या अहिल्यानगर किल्ला विकास प्रकल्पाची अंमलबजावणी रखडल्याकडे संरक्षण मंत्र्यांचे लक्ष वेधले. भारतीय सैन्य आणि अहिल्यानगर जिल्हा प्रशासन यांच्यातील सामंजस्य करार अद्याप पूर्ण न झाल्याने विकासकामांना सुरुवात होऊ शकलेली नसल्याचे त्यांनी नमूद केले. हा करार तातडीने पूर्ण करून किल्ल्यावरील संवर्धन, पर्यटक सुविधा, सुशोभीकरण आणि पायाभूत सुविधांची कामे सुरू करण्यासाठी आवश्यक निर्देश द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली.  दुसऱ्या निवेदनात अहिल्यानगर येथील व्हीआरडीई या देशातील महत्त्वाच्या संरक्षण संशोधन संस्थेचे कोणत्याही परिस्थितीत स्थलांतर होऊ नये, अशी स्पष्ट भूमिका मांडण्यात आली. संरक्षण संशोधन, लष्करी वाहन चाचण्या आणि स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानाच्या विकासात अहिल्यानगरने देशपातळीवर स्वतंत्र ओळख निर्माण केली असून, प्रस्तावित संरक्षण संशोधन आणि उद्योगाशी संबंधित ‘डिफेन्स हब’ देखील अहिल्यानगरमध्येच विकसित करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. हरेगाव मळा परिसरातील जमिनीबाबत प्रलंबित शेतकरी दावे आणि जमीन हक्कांचे प्रश्न निकाली काढल्याशिवाय कोणताही अंतिम निर्णय घेऊ नये, असेही त्यांनी निवेदनात नमूद केले.तिसऱ्या निवेदनाद्वारे नगर तालुक्यातील वाकोडी, दरेवाडी, निबोडी तसेच सैन्य हद्दीलगतच्या इतर गावांतील बांधकाम परवानगी आणि अनापत्ती ना हरकत प्रमाणपत्रा संदर्भातील प्रश्न मांडण्यात आले.

COMMENTS