Homeताज्या बातम्या

संभाजीनगर-अहिल्यानगर-पुणे महामार्ग सहापदरी कराखासदार नीलेश लंके यांची मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी

अहिल्यानगर : खासदार नीलेश लंके यांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३-एफ (छत्रपती संभाजीनगर-अहिल्यानगर-शिरूर-पुणे) या सुमारे २२० किलोमीटर लांबीच्या

कोपरगावमध्ये मध्यरात्री गुंडांचा हैदोसधारदार शस्त्रे, दांडक्यांसह तरुणांचा ‘राडा’; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
प्रशासनाने वर्षभर गतिमान सेवा द्यावीआ. काळे ; ‘गतिमान नागरी सेवा पुरस्कारा’चा उद्देश साध्य करण्याचे आवाहन
वाकडी रोडवर  गावठी कट्टा विक्री करणारा जेरबंद 

अहिल्यानगर : खासदार नीलेश लंके यांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३-एफ (छत्रपती संभाजीनगर-अहिल्यानगर-शिरूर-पुणे) या सुमारे २२० किलोमीटर लांबीच्या महामार्गाचे सहापदरी सिमेंट-काँक्रीट मार्गात रूपांतर करण्याची मागणी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. याबाबत त्यांनी नवी दिल्लीत मंत्री गडकरी यांची भेट घेऊन या महत्त्वाच्या मार्गाच्या सर्वांगीण विकासासाठी तातडीने प्रशासकीय मंजुरी देण्याची विनंती केली आहे.खासदार लंके यांनी या संदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पुणे हे राज्यातील औद्योगिक, शैक्षणिक, वैद्यकीय व आध्यात्मिक केंद्र असून मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातून दररोज हजारो नागरिक या मार्गाने प्रवास करतात. मात्र, शिरूर ते छत्रपती संभाजीनगर दरम्यानचा राष्ट्रीय महामार्ग अनेक ठिकाणी अरुंद, खड्डेमय व जीर्ण अवस्थेत असल्याने वाहतूक कोंडी, अपघात आणि प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.शिरूर-पुणे फ्लायओव्हर प्रकल्पाला गती दिल्याबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार व्यक्त करताना, उर्वरित संपूर्ण महामार्गाचाही विकास त्याच धर्तीवर करण्यात यावा, अशी मागणी खासदार लंके यांनी केली आहे.बीराष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३-एफच्या संपूर्ण २२० किलोमीटर मार्गाचे सहापदरी सिमेंट-काँक्रीटीकरण, आवश्यक ठिकाणी फ्लायओव्हर उभारणी व इतर पूरक सुविधांच्या कामांना प्राधान्य देऊन तातडीने मंजुरी द्यावी, अशी मागणी खासदार निलेश लंके यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. त्यांच्या या मागणीमुळे मराठवाडा, अहिल्यानगर आणि पुणे या तीन महत्त्वाच्या विभागांतील दळणवळण अधिक सुरक्षित, जलद आणि सक्षम होण्यास मदत होणार आहे.विकासाला चालनाया महामार्गावर श्रीक्षेत्र शनिशिंगणापूर, श्री ज्ञानेश्वर माऊली मंदिर (नेवासा), शिर्डी, देवगड, थेऊर गणपती, रांजणगाव गणपती यांसारखी प्रमुख तीर्थक्षेत्रे असून वाळूज, नेवासा, अहिल्यानगर, सुपा, रांजणगाव, शिक्रापूर, चाकण आणि तळेगाव ही महत्त्वाची औद्योगिक केंद्रेही या मार्गावर आहेत. त्यामुळे या महामार्गाचे सहापदरीकरण झाल्यास धार्मिक पर्यटन, उद्योग, शेतीमाल वाहतूक, गुंतवणूक, रोजगारनिर्मिती आणि ग्रामीण विकासाला मोठी चालना मिळणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

COMMENTS