Homeताज्या बातम्या

प्रसुतीवेळी नवजात बाळ जमिनीवर पडलेबाळावर उपचार सुरू ; कुटुंबियांची कारवाई करण्याची मागणी

मुंबई : विरार पश्‍चिम येथील एका खासगी रुग्णालयात प्रसूतीदरम्यान वैद्यकीय निष्काळजीपणाचा गंभीर आरोप समोर आला आहे. प्रसूतिवेदना सुरू असलेल्या सात म

माझी बदली करा, मी खूप त्रासात आहे… आरोग्यमंत्र्यांचे पाय धरून ढसाढसा रडली महिला नर्स; जोधपूरमधील भावुक व्हिडिओ व्हायरल!
जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात अस्वच्छतेचे साम्राज्यकर्मचारी व नागरिक त्रस्त, प्रशासनाची उदासीनता कायमइमारतीच्या पायर्‍यांचे ग्रील व स्लॅब खराब झाले
कर्नाटकात आढळले 7000 विद्यार्थी एचआयव्ही बाधितसरकारकडून महाविद्यालयांत नियमित तपासणी व जनजागृती
नवजात बाळांना होणारी कावीळ: कारणे, लक्षणे आणि उपचार | Jaundice in Newborn Babies in Marathi

मुंबई : विरार पश्‍चिम येथील एका खासगी रुग्णालयात प्रसूतीदरम्यान वैद्यकीय निष्काळजीपणाचा गंभीर आरोप समोर आला आहे. प्रसूतिवेदना सुरू असलेल्या सात महिन्यांच्या गर्भवती महिलेची वेळेवर योग्य काळजी न घेतल्यामुळे प्रसूती उभ्याउभ्याच झाल्याचा आणि नवजात बाळ थेट जमिनीवर पडल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या घटनेत बाळ गंभीर जखमी झाले असून त्याच्यावर ठाण्यातील रुग्णालयाच्या नवजात शिशू अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
माहितीनुसार, बुधवारी तीव्र प्रसूतिवेदना सुरू झाल्यानंतर संबंधित महिलेला विरार पश्‍चिम येथील डॉ. जोगळेकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रसूती जवळ आल्याची जाणीव होत असल्याचे महिलेने वारंवार सांगितल्याचा दावा तिच्या नातेवाईकांनी केला आहे. मात्र, डॉक्टर आणि परिचारिका यांनी आवश्यक ती तत्परता दाखवली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, वेळेत वैद्यकीय मदत न मिळाल्याने महिलेची प्रसूती उभ्याउभ्याच झाली. त्यावेळी नवजात बाळ सुमारे अडीच ते तीन फूट उंचीवरून थेट जमिनीवर पडल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेत बाळाच्या डोक्यासह शरीराच्या इतर भागांना दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे. बाळाची प्रकृती चिंताजनक झाल्यानंतर त्याला तातडीने ठाण्यातील रुग्णालयात हलविण्यात आले. सध्या त्याच्यावर नवजात शिशू अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून प्रकृती गंभीर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. घटनेनंतर संतप्त झालेल्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा निषेध करत संबंधित डॉक्टर व कर्मचार्‍यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, या प्रकरणावर रुग्णालय प्रशासनाकडून अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही. या घटनेची सखोल चौकशी करून जबाबदार व्यक्तींवर नियमानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत असून, वसई-विरार महापालिकेच्या आरोग्य विभागानेही या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

COMMENTS