Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सत्तेचा अमरपट्टा घेऊन कुणीही आलेला नाही

मनसेप्रमुख राज ठाकरेंची भाजपवर टीका

पुणे/प्रतिनिधी ः देशात सध्या काही पक्षांना सत्तेची नशा चढली आहे. मात्र सत्तेचा अमरपट्टा घेऊन कुणीही जन्माला येत नाही. सत्ता जेव्हा हातात येते. ते

राज ठाकरेंनी केली उद्धव ठाकरेंची भन्नाट नक्कल
 अनेक मुद्द्यांवर शिष्टमंडळ घेऊन भेटलो आणि चर्चा झाली – राज ठाकरे
राज ठाकरे यांच्या विरुद्ध परळी न्यायालयाने बजावलेलं अटक वॉरंट रद्द

पुणे/प्रतिनिधी ः देशात सध्या काही पक्षांना सत्तेची नशा चढली आहे. मात्र सत्तेचा अमरपट्टा घेऊन कुणीही जन्माला येत नाही. सत्ता जेव्हा हातात येते. तेव्हाच ती हातातून निसटायला लागते. त्यामुळे आपण नेहमीच सत्तेवर राहू अशा भ्रमात कुणी राहू नये, अशी टीका  मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी भाजपवर केली. राज ठाकरे यांनी पिंपरी चिंचवड एडिटर्स गिल्ट आयोजित पत्रकार कायदा विरोधी परिषदेला संबोधित करतांना ते बोलत होते.
यावेळी राज ठाकरे यांनी बदलत्या पत्रकारितेबद्दल चिंता व्यक्त करत भाजप सरकारवर टीका केली. कार्यक्रमात बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकारांवर होणारे हल्ले आणि राजकीय दबावाबद्दल चिंता व्यक्त केली. पत्रकारांवरील हल्ले निषेधार्ह आहेत. आम्हालासुद्धा त्याचा राग आहे. असे म्हणत महाराष्ट्रात अजूनही पत्रकारिता जिवंत असल्याचे ठाकरे यावेळी म्हणाले. ट्रोलिंग करणार्‍याला काही पडलेली नसते. तुम्ही कशाला वाटून घेता. त्यांना मागच्या पुढचा इतिहास माहीत नसतो. मुलाखत ऐकलेली नसते. बास फक्त व्यक्त व्हायचे. राजकीय लोकांनी पाळलेली लोके आहेतच. त्या पाळलेल्या लोकांवर कशाला प्रतिक्रिया देता? ते पाळलेले आहेत. त्यांना लिहायचे दर महिन्याला पैसे मिळतात. त्यांचा कसला विचार करता? असे ते यावेळी म्हणाले. प्रत्येकाचा एक काळ असतो. सत्तेचा अमरपट्टा कोणीही घेऊन येत नसतो. सत्ता ज्या दिवशी हातात येते, त्याच दिवशी ती जायला लागते. ती टिकवायची किती, तेवढेच तुमच्या हातात असते. विरोधी पक्ष कधी जिंकत नसतो. सत्ताधारी पक्ष हारत असतो, असंही राज यांनी नमूद केले. पूर्वी पत्रकारांसाठी लढणार्‍या भाजप पक्षाच्या सत्तेच्या काळातच पत्रकारांवर बंधने लादली जात आहेत, ही चिंताजनक बाब असल्याचे म्हणत भाजपने त्यांचा इतिहास एकदा उलघडून पाहावा.. असा टोलाही राज ठाकरे यांनी लगावला. पत्रकार मला म्हणतात, तुमच्या सभांना गर्दी होते, पण मते मिळत नाहीत. मला सांगा, 2009 ते आज वर माझ्या उमेदवारांना मतं कुठून मिळतात. काय रतन खत्रीने आकडे काढले होते का? सत्तेचा अमरपट्टा कोणी घेऊन येत नसतो. सत्ता हातात आली की ते जायला सुरू होते. विरोधी कधी जिंकत नसतो, सत्ताधारी हारत असतो. आता तुम्ही पत्रकार आहात, म्हणजे तुम्ही काय आमचे वाभाडे काढणार का? राज ठाकरे आहे मी, हे मी खपवून घेणार नाही. मी यावर व्यक्त होणारच, असे राज ठाकरे म्हणाले.

पत्रकारांचे काम आमचे डोळे उघडणे – यावेळी बोलतांना राज ठाकरे म्हणाले की, मनसेची ब्लू प्रिंट त्याचेच एक जिवंत उदाहरण. मी ती सादर केली त्यानंतर कोणी ती ब्लू प्रिंट पाहिली नाही. फक्त मला हिणवले गेले. कोणी तरी सुपारी दिली की हे पत्रकार मला येऊन विचारणार. आता मला सांगा पत्रकार हल्ला ठीक आहे, तुमच्यावर हल्ला झाला की जसे वाईट वाटते, तसेच आम्हाला ही वाटते. तुमचे काम आमचे डोळे उघडणे, समाजाला दिशा दाखवणे, प्रबोधन करणे हे आहे, असेही त्यांनी म्हटले. पण जाणीवपूर्वक काहीही ठरवून बातम्या देणे हे तुमचे काम नाही. पत्रकारांना काही बोलले की त्यांच्या कुटुंबियांना वाईट वाटते, मग राज ठाकरेंबाबत काही बोलल्यावर त्यांच्या कुटुंबियांना वाईट वाटत नसेल का? म्हणजे तुमचे ते कुटुंब अन आमचे काय? याचे भान पत्रकारांनी ठेवायला हवे, असेही राज ठाकरे म्हणाले.

COMMENTS