Homeताज्या बातम्या

सोनाल पाटील यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या महाराष्ट्र महिला प्रदेश कार्याध्यक्षपदी निवड

बीड: देशातील प्रमुख राजपूत युवा संघटना असलेल्या ‘श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना’ (एकीकृत राष्ट्रीय राजपूत युवा संगठन भारत) च्या महाराष्ट्र प्रदे

गुरुपौर्णिमेनिमित्त सावली अर्बनमध्ये आदर्श शिक्षिकांचा सन्मान; ’सौभाग्यवती ठेव योजना’ विजेत्यांना बक्षीस वितरण
आरक्षण वाचवण्यासाठी २६ जूनला चैत्यभूमीवर उपस्थित राहा; उपवर्गीकरणाला विरोध करण्याचे अ‍ॅड. तेजस वडमारे यांचे आवाहन
स्वतःविरुद्धच गुन्हा दाखल करा! उपविभागीय अधिकार्‍यांचे थेट किनवट तहसीलदारांना पत्र; प्रशासकीय वर्तुळात प्रचंड संभ्रम

बीड: देशातील प्रमुख राजपूत युवा संघटना असलेल्या ‘श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना’ (एकीकृत राष्ट्रीय राजपूत युवा संगठन भारत) च्या महाराष्ट्र प्रदेश महिला विभागाच्या प्रदेश कार्याध्यक्षपदी बीड जिल्ह्यातील सौ. सोनाल अरविंद पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षा सौ. छायाताई विजयसिंह महेर यांनी सोनाल पाटील यांना अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान केले. त्यांचा कार्यकाळ २८ जुलै २०२६ ते २८ जुलै २०२७ या एक वर्षाच्या कालावधीसाठी राहणार आहे.

नियुक्तीनंतर संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी विश्वास व्यक्त केला की, माँ करणीच्या आशीर्वादाने आणि संघटनेच्या तत्त्वांचे पालन करत सोनाल पाटील या पदाची प्रतिष्ठा राखतील. संघटनेची एकता, मजबुती आणि विस्तारासाठी त्या निष्ठेने व शिस्तीने कार्य करतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

ही नियुक्ती राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शीला सुखदेवसिंह गोगामेडी, राष्ट्रीय उपाध्यक्ष योगेंद्रसिंह कटार, आनंदसिंह ठोके, अभयसिंह गोगामेडी, महाराष्ट्र प्रभारी जीवनसिंह सोलंकी आणि प्रदेशाध्यक्ष प्रवीण पाटील राजपूत यांच्या मार्गदर्शन व मान्यतेने करण्यात आली आहे. सोनाल अरविंद पाटील यांच्या या निवडीबद्दल बीड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील राजपूत समाजबांधव, करणी सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

COMMENTS