Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

स्वातंत्र्य दिनी जन्म घेतलेल्या मुलींचे स्वागत

अंबाजोगाई प्रतिनिधी - स्वातंत्र्य दिनी जन्म घेतलेल्या मुलींचे स्वागत करून स्त्रि-जन्माचे स्वागत हा अनोखा उपक्रम अंबाजोगाई येथील आर्य वैश्य महिला

चांदवड देवळाचे आमदार राहुल आहेर यांची अगस्ती आश्रमास भेट
राऊत राष्ट्रवादी ची सुपारी घेऊन शिवसेना संपवायला निघाले.
स्वप्नील लोणकरच्या आत्महत्येचे राज्यभरात पडसाद

अंबाजोगाई प्रतिनिधी – स्वातंत्र्य दिनी जन्म घेतलेल्या मुलींचे स्वागत करून स्त्रि-जन्माचे स्वागत हा अनोखा उपक्रम अंबाजोगाई येथील आर्य वैश्य महिला  महासभेच्या वतीने येथील स्वाराती रूग्णालयातील स्त्री-रोग व प्रसुती कक्षात राबविण्यात आला. यावेळी जन्म घेतलेल्या 33 मुलींच्या मातांचे बेबी किट देवून स्वागत व सन्मान करण्यात आला.
येथील आर्य वैश्य महिला महासभेच्या वतीने सातत्याने विविध उपक्रम राबविण्यात येतात. या वर्षी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने स्त्री-जन्माचे स्वागत हा उपक्रम राबविण्याचा मानस बीड जिल्हा महासभेच्या कार्याध्यक्ष मनिषा प्रदिप झरकर यांच्या संकल्पनेतून साकार झाला. हा उपक्रम राबविण्यासाठी स्थानिक महिला मंडळाच्या अध्यक्षा वंदना चक्रवार, जयश्री पोकळे यांनी स्वाराती रूग्णालयात स्वातंत्र्य दिनी जन्म घेतलेल्या 23 मुलींच्या मातांना बेबी कीटचे वाटप केले. यावेळी रूग्णालयातील डॉक्टर व कर्मचारी यांच्यासह आर्य वैश्य महिला महासभेच्या पदाधिकारी उपस्थित होत्या.

COMMENTS