Homeताज्या बातम्या

बीड-पुणे रेल्वे तातडीने सुरू करा; रेल्वे बोर्डाने दाखविली सकारात्मकता

खा. बजरंग सोनवणे यांनी घेतली रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षांची भेट; मुंबई-बीड एक्सप्रेस व 'गुड्स शेड'चीही मागणी बीड: बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवा

संत गोरोबा काकांच्या ७५९ व्या जयंतीनिमित्त नांदेडमध्ये भव्य शोभायात्रा; गुणवंतांचा होणार गौरव
भिवंडीतील भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू; कारने तीन दुचाकींना उडवले
कर्जमाफीच्या यादीत नाव नसल्याने शेतकऱ्याची आत्महत्या; यवतमाळ जिल्ह्यातील भाम गावातील दुर्दैवी घटना

खा. बजरंग सोनवणे यांनी घेतली रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षांची भेट; मुंबई-बीड एक्सप्रेस व ‘गुड्स शेड’चीही मागणी

बीड: बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याच्या रेल्वे कनेक्टिव्हिटीला आणि विकासाला खर्‍या अर्थाने गती देण्यासाठी बीड-पुणे दैनिक रेल्वे सेवा तातडीने सुरू करण्यात यावी, अशी जोरदार मागणी बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी केली आहे.

नवी दिल्ली येथे रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश कुमार यांची खा. सोनवणे यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन विविध महत्त्वाच्या मागण्यांचे सविस्तर निवेदन सुपूर्द केले. रेल्वे बोर्डाने या सर्व मागण्यांबाबत अत्यंत सकारात्मकता दर्शवली असून आवश्यक ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

या महत्त्वाच्या भेटीदरम्यान खा. बजरंग सोनवणे यांनी बीड जिल्ह्यातील प्रलंबित रेल्वे प्रश्नांकडे रेल्वे बोर्डाचे लक्ष वेधले. निवेदनात खालील प्रमुख मागण्या करण्यात आल्या:

  • बीड-पुणे (हडपसर) रेल्वे: बीड-हडपसर आणि हडपसर-बीड दरम्यान प्रवाशांच्या सोयीसाठी तातडीने दैनिक रेल्वे सेवा सुरू करण्यात यावी.
  • मुंबई-बीड एक्सप्रेस: मुंबई व बीड दरम्यान प्रवाशांचा वाढता ओघ लक्षात घेता स्वतंत्र दैनिक एक्सप्रेस रेल्वे सेवा सुरू करावी.
  • गुड्स शेड (माल गोदाम): अहमदनगर-बीड-परळी वैजनाथ रेल्वे प्रकल्पांतर्गत बीड, आष्टी आणि नारायणडोह या रेल्वे स्थानकांवर मालाची चढ-उतार करण्यासाठी सुसज्ज माल गोदाम उभारण्यात यावे.

यावेळी रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सतीश कुमार यांनी खा. सोनवणे यांनी मांडलेल्या सर्व मागण्या अतिशय गांभीर्याने आणि सकारात्मकतेने ऐकून घेतल्या. विशेषत: बीड-हडपसर (पुणे) रेल्वे सेवा लवकरात लवकर सुरू करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून आवश्यक ती प्रशासकीय व तांत्रिक कार्यवाही वेगाने केली जाईल, असा शब्द त्यांनी दिला. तसेच इतर सर्व मागण्यांचाही तांत्रिक व प्रशासकीय स्तरावर सखोल आढावा घेऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

जिल्ह्याच्या विकासाला मिळणार गती

अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्ग हा बीड जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. बीड, आष्टी आणि नारायणडोह येथे माल गोदाम उभे राहिल्यास स्थानिक शेतकरी, व्यापारी आणि उद्योग क्षेत्राला मोठा फायदा होणार असून कृषी मालाची वाहतूक अत्यंत सुलभ होणार आहे.

“बीड जिल्ह्यातील विद्यार्थी, नोकरदार, शेतकरी, व्यापारी, उद्योग क्षेत्र, रुग्ण आणि सर्वसामान्य प्रवाशांच्या दृष्टीने या रेल्वे सेवा व सुविधा अत्यंत महत्वाच्या आहेत. दिल्लीत झालेल्या या सकारात्मक चर्चेनंतर सर्व मागण्या प्रत्यक्ष कागदावरून रुळावर येईपर्यंत माझा सातत्यपूर्ण पाठपुरावा असाच सुरू राहील.”

खा. बजरंग सोनवणे

COMMENTS