Homeताज्या बातम्या

गुरु जीवनातील अंधकार दूर करतात: शिक्षण विस्तार अधिकारी रघुनाथ लबडे; शहरटाकळी विद्यालयात गुरुपौर्णिमा साजरी

शहरटाकळी: गुरुशिवाय आपले जीवन अर्थहीन आहे. आई-वडील हे आपले पहिले गुरु असतात आणि त्यानंतर शिक्षक हे आपले गुरु असतात. गुरु आपले जीवन सुखकर करण्यासा

आभाळभर दुःखात भाजपाचा मायेचा हात; नामेवाड कुटुंबाला २५ हजारांची आर्थिक मदत
राज्यात पुढील दोन ते तीन दिवस पावसाचा जोर कायम राहणार; अनेक भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा
युवक-युवतींनी माय भारत पोर्टलवर १५ ऑगस्टपर्यंत नोंदणी करावी; जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांचे आवाहन

शहरटाकळी: गुरुशिवाय आपले जीवन अर्थहीन आहे. आई-वडील हे आपले पहिले गुरु असतात आणि त्यानंतर शिक्षक हे आपले गुरु असतात. गुरु आपले जीवन सुखकर करण्यासाठी आपल्याला नेहमी मार्गदर्शन करत असतात. ते आपल्या जीवनातील दुःख, दैन्य आणि अंधकार नाहीसा करण्यासाठी निरंतर प्रयत्न करतात, असे गौरवोद्गार शिक्षण विस्तार अधिकारी रघुनाथ लबडे यांनी काढले.

ते कर्मयोगी आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाच्या शहरटाकळी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात ‘गुरुपौर्णिमेनिमित्त’ आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अश्विनी उगले होत्या. व्यासपीठावर ढोरजळगाव केंद्राचे केंद्रप्रमुख भोईटे सर, भावीनिमगाव जि.प. शाळेचे मुख्याध्यापक सुभाष शेटे, राजाभाऊ इंगळे, अंकुशराव फुंदे, देवटाकळी जि.प. शाळेच्या शिक्षिका शीला शेटे, विद्यालयाच्या प्राचार्या अंजली चिंतामण, पर्यवेक्षक पोपट खताळ यांच्यासह सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.

यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा भेटवस्तू देऊन आदरपूर्वक सन्मान केला.

कार्यक्रमात विद्यालयाची विद्यार्थिनी सृष्टी निंबाळकर, साक्षी मोटे आणि नलिनी कावले यांनी मनोगत व्यक्त केले, तर सहशिक्षक ज्ञानेश्वर जाधव यांनी गुरुचे जीवनातील महत्त्व विशद केले. प्रमुख पाहुण्या शीला शेटे यांनी गुरु आपल्यावर उत्तम संस्कार करत असून शिस्त, वक्तशीरपणा, जिद्द व प्रामाणिकपणा यावरच आपले जीवन अवलंबून असल्याचे सांगितले. अध्यक्षा अश्विनी उगले यांनी पौराणिक कथांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व पटवून दिले.

COMMENTS