कोपरगाव: कोपरगाव तालुका पोलिसांनी अवैध देशी व विदेशी दारू विक्री करणाऱ्यांविरोधात धडक कारवाई करत तिघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून १५ हजार
कोपरगाव: कोपरगाव तालुका पोलिसांनी अवैध देशी व विदेशी दारू विक्री करणाऱ्यांविरोधात धडक कारवाई करत तिघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून १५ हजार ४३५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली.
या कारवाईत निलेश नारायण ब्राह्मणे (रा. चासनळी, ता. कोपरगाव), दत्तू खंडू गांगवे (रा. धारणगाव, ता. कोपरगाव) आणि हॅपी श्रीराम पंजाबी (रा. पोहेगाव, ता. कोपरगाव) यांच्यावर छापा टाकण्यात आला. या तिन्ही आरोपींकडून देशी व विदेशी दारूचा साठा जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात संबंधित आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलीस पुढील तपास करत आहेत. ही धडक कारवाई पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी, पोलिस कॉन्स्टेबल जयदीप गवारे, किसन सानप आणि अंबादास वाघ यांच्या पथकाने केली आहे.

COMMENTS