अहिल्यानगर: अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) अहिल्यानगर महानगर शाखेच्या वतीने गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून शहरातील विविध महाविद्यालयांना भेट

अहिल्यानगर: अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) अहिल्यानगर महानगर शाखेच्या वतीने गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून शहरातील विविध महाविद्यालयांना भेट देत प्राचार्य, प्राध्यापक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. या उपक्रमांतर्गत शहरातील ३०० हून अधिक प्राध्यापकांना प्रत्यक्ष भेटून गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
भारतीय संस्कृतीत गुरुचे स्थान सर्वोच्च मानले जाते. ज्ञान, शील आणि एकता या त्रिसूत्रीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे उत्तम व्यक्तिमत्त्व घडविण्यासोबतच राष्ट्रनिर्मितीत शिक्षकांचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याची भावना यावेळी अभाविपतर्फे व्यक्त करण्यात आली.
अभाविपच्या कार्यकर्त्यांनी शहरातील विविध महाविद्यालयांमध्ये जाऊन शिक्षकांना शुभेच्छापत्र देऊन त्यांच्या शैक्षणिक कार्याबद्दल सस्नेह कृतज्ञता व्यक्त केली. याप्रसंगी उपस्थितांशी चालू शैक्षणिक घडामोडी, विद्यार्थीहिताचे विविध प्रश्न आणि परिसर विकासाच्या उपक्रमांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. या उपक्रमात अभाविप अहिल्यानगर महानगर शाखेचे सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

COMMENTS