Homeताज्या बातम्या

कचरा टेंडरवरून पुण्यात एकनाथ शिंदे यांची शिवसेना आक्रमक; पालिकेच्या मुख्य गेटवर चढून जोरदार निदर्शने!

पुणे: पुणे महानगरपालिकेच्या गलथान कारभाराविरोधात आणि कचरा व्यवस्थापनाच्या वादग्रस्त टेंडरविरोधात उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (एकना

सार्वजनिक स्वच्छतागृहातील पाणी थेट हॉटेलमध्ये! कुरुंदवाडमधील किळसवाण्या प्रकाराने कोल्हापुरात खळबळ; नगरपरिषदेची नोटीस
मनसे विद्यार्थी सेनेच्या पाथर्डी तालुकाध्यक्षपदी ओम खेडकर यांची निवड; शासकीय विश्रामगृहातील बैठकीत नियुक्ती जाहीर
परळीतील नवीन पशुवैद्यकीय पदवी महाविद्यालयासाठी १३ हेक्टर शासकीय जमीन विनामूल्य; शासनाचा आदेश जारी
गेटवर चढले, थेट कचरा मध्ये फेकला, पुण्यात शिंदे गट आक्रमक, थेट महापालिपुढे  आंदोलन! - Marathi News | Shivsena activist protest at pune municipal  corporation against garbage waste tender ...

पुणे: पुणे महानगरपालिकेच्या गलथान कारभाराविरोधात आणि कचरा व्यवस्थापनाच्या वादग्रस्त टेंडरविरोधात उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (एकनाथ शिंदे गट) अत्यंत आक्रमक झाली आहे. शहरप्रमुख नाना भानगिरी यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी महापालिकेवर धडक मोर्चा काढत थेट पालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर चढून जोरदार निदर्शने केली.

कचरा व्यवस्थापन विभागाकडून कचऱ्याच्या नियोजनासाठी एक विशेष टेंडर काढण्यात आले असून, हे टेंडर ‘इमिग्रीन’ कंपनीला दिले जात आहे. या टेंडर प्रक्रियेत मोठा गैरव्यवहार असल्याचा आरोप करत सर्वपक्षीय नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी यापूर्वीच तीव्र नाराजी व्यक्त केली होती. हे टेंडर तत्काळ रद्द करण्यात यावे, अशी मागणी लावून धरण्यात आली होती. मात्र, महापालिका प्रशासनाकडून यावर कोणताही ठोस निर्णय न घेण्यात आल्यामुळे अखेर शिवसेना नेते आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरले.

शिवसेना शहरप्रमुख नाना भानगिरी यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांच्या हातात पक्षाचे भगवे झेंडे, फलक आणि बॅनर्स होते. पालिकेच्या प्रवेशद्वारावरच कार्यकर्त्यांनी महापालिका प्रशासनाच्या कारभाराविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

दरम्यान, एकीकडे महापालिकेच्या गेटवर शिवसेनेचे आंदोलन सुरू असतानाच, दुसरीकडे पालिका परिसराच्या आत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) कार्यकर्तेही आक्रमक झाले होते. कचरा व्यवस्थापनाच्या निषेधार्थ मनसे आंदोलकांनी थेट पालिकेच्या आवारातच कचरा फेकून प्रशासनाचा निषेध नोंदवला. या जोड-आंदोलमांमुळे महापालिका परिसरात काही काळ मोठा तणाव निर्माण झाला होता.

COMMENTS