Homeताज्या बातम्या

गिरीश महाजन आणि विजय चौधरी यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल; रक्षा खडसे यांच्या राजीनाम्याची मागणी, भाजपमध्ये खळबळ

जळगाव: भाजपचे उत्तर महाराष्ट्र संयोजक विजय चौधरी आणि राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्यातील एक कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्य

दुर्गम काचरवाडीच्या ऊसतोड कामगार कुटुंबातील ज्ञानेश्वरची ‘नीट’मध्ये घवघवीत कामगिरी; ५९० गुण मिळवत मिळवले उल्लेखनीय यश
जेन झीची ’गांधीगिरी’ देशभर चर्चेत; आंदोलनाची नवी भाषा लोकशाहीला नवा चेहरा देत आहे का?
माथेरानला ५ एकर पार्किंग आणि नागपूरच्या क्रीडा संकुलाला ४ कोटींचा निधी; मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय
Jalgaon Audio Clip Controversy; Eknath Khadse & Rohit Pawar Criticize  Leaders

जळगाव: भाजपचे उत्तर महाराष्ट्र संयोजक विजय चौधरी आणि राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्यातील एक कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) नेते एकनाथ खडसे आणि त्यांच्या सून तसेच केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याबाबत आक्षेपार्ह आणि आक्रमक भाषेचा वापर केल्याचे ऐकायला मिळत आहे. या कथित संभाषणामुळे भाजपमधील अंतर्गत मतभेद आणि महाजन-खडसे यांच्यातील जुना संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

जरी या ऑडिओ क्लिपच्या सत्यतेबाबत अद्याप कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नसला, तरी यामुळे महाजन आणि खडसे कुटुंबीयांतील राजकीय वैर अजूनही संपलेले नाही, हे स्पष्ट दिसून येत आहे.

“रक्षा खडसेंचा राजीनामा घ्यावा”; कथित क्लिपमध्ये तीव्र संताप

व्हायरल झालेल्या या ऑडिओ क्लिपमध्ये विजय चौधरी मंत्री गिरीश महाजन यांच्याशी संवाद साधताना रक्षा खडसे यांच्या राजीनाम्याची थेट मागणी करताना दिसत आहेत. “एकनाथ खडसे आणि त्यांची मुलगी नेहमीच भाजपवर टीका करत असतात, मग त्यांच्याच घरातील रक्षा खडसे यांना आपण केंद्रात मंत्री बनवून का ठेवले आहे? त्यांना मंत्रिमंडळातून हटवले पाहिजे… हे कुठेतरी थांबले पाहिजे,” असा संतप्त सवाल चौधरी यांनी केला.

पुढे बोलताना ते म्हणाले की, “उठले-सुटले की भाजपवर घाणेरडे आरोप केले जातात. सगळे एकाच घरात राहतात आणि एकमेकांना मदत करतात, मग ही दुहेरी भूमिका कशी चालणार? रक्षा खडसेंनी राजीनामा द्यावा किंवा पक्षाने त्यांच्यावर कारवाई करावी, अशी आक्रमक भूमिका आपण पक्षाकडे मांडली पाहिजे.” या संभाषणादरम्यान मंत्री गिरीश महाजन हे “हम्म… बरोबर आहे” असे म्हणत सहमती दर्शवत असल्याचे क्लिपमध्ये ऐकायला मिळत आहे.

या कथित ऑडिओ क्लिपमुळे उत्तर महाराष्ट्रासह संपूर्ण राज्याच्या राजकारणात विविध चर्चांना उधाण आले असून, आता या प्रकरणावर भाजप वरिष्ठ नेतृत्व काय भूमिका घेते आणि खडसे गट यावर कशी प्रतिक्रिया देतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS