विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर यश संपादन करावे. शिक्षण घेत असतानाच स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करून भविष्यातील संधींचा लाभ घ्य

विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर यश संपादन करावे. शिक्षण घेत असतानाच स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करून भविष्यातील संधींचा लाभ घ्यावा, असे प्रतिपादन मा. डॉ. योगेश भैय्या क्षीरसागर यांनी केले.
चौसाळा येथील कला व विज्ञान महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी चंद्रकांत महादेव मुळे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून पोलीस उपनिरीक्षक पदावर निवड झाल्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमात डॉ. क्षीरसागर बोलत होते. ग्रामीण भागातील वाढवणा गावातील तरुणाने मिळवलेले हे यश कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे पदव्युत्तर संचालक प्रा. डॉ. सुधाकर वनवे होते. यावेळी माजी प्राचार्य डॉ. विलास भिलारे, बीड पंचायत समितीचे माजी सभापती काकासाहेब जोगदंड, माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक शेठ लोढा यांच्यासह प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक उपस्थित होते. दरम्यान, सामाजिक वनीकरण विभाग बीड व चौसाळा महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या सघन वृक्ष लागवड प्रकल्पाची डॉ. योगेश क्षीरसागर यांनी पाहणी केली. या प्रकल्पांतर्गत सुमारे 15 हजार देशी वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. यावेळी वनपाल रोहिणी मसवले उपस्थित होत्या. तसेच महाविद्यालयाच्या विस्तारित इमारत बांधकामाचे भूमिपूजनही डॉ. योगेश क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक व प्राध्यापक उपस्थित होते.

COMMENTS