Homeताज्या बातम्या

उपवर्गीकरण रद्द करण्यासाठी रिपाइंराज्यभर लढा उभा करणार:राजू जोगदंड

आरक्षणामध्ये अबकड उपवर्गीकरणाचा मुद्दा समोर ठेवून आपल्या राजकीय फायद्यासाठी 59 जातीमध्ये फूट पाडण्याचे षडयंत्र राज्यकर्त्यांकडून राज्यभर राबविण्य

पुराच्या पाण्यात अडकलेल्या 22 वाहनचालकांना वाचवण्यात यश!
दूध भेसळ प्रकरणातील मुख्य आरोपीचा जामीन मंजूर
कांदा उत्पादकांच्या प्रश्‍नांवर उपाययोजना करावी : मुख्यमंत्री फडणवीस; सचिव स्तरीय समितीने कांदा प्रश्‍नी दीर्घकालीन पर्यायांची अंमलबजावणी
Protests at the District Collector's Office against sub-categorization,  political conspiracy to divide 59 castes in reservation - RPI



आरक्षणामध्ये अबकड उपवर्गीकरणाचा मुद्दा समोर ठेवून आपल्या राजकीय फायद्यासाठी 59 जातीमध्ये फूट पाडण्याचे षडयंत्र राज्यकर्त्यांकडून राज्यभर राबविण्यात येत आहे. उपवर्गीकरण लागू करण्यासाठी सुरु असलेले षडयंत्र हाणून पाडण्यासाठी व उपवर्गीकरणाची प्रक्रिया रद्द करण्यासाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या आदेशावरुन युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष तथा रिपाइंचे बीड जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि.27 जुलै 2026 रोजी रिपाइंचे जिल्हा सरचिटणीस राजू जोगदंड यांच्या नेतृत्वाखाली रिपाइंच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर आयोजित तिव्र निदर्शने आंदोलनात करण्यात आले.
भारतीय संविधानाच्या माध्यमातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी अनु-जमतीमधील 59 जातीच्या समाज बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षण लागू केले होते. परंतू अनु-जातीच्या आरक्षणामध्ये अबकड उपवर्गीकरणाचा मुद्दा समोर ठेवून आपल्या राजकीय फायद्यासाठी संघटीत शक्तीचे विभाजन करून 59 जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न राज्यकर्त्यांकडून राज्यभर करण्यात येत आहे. आरक्षणाच्या माध्यमातून 59 जातींना मिळालेले हक्क आबाधित ठेवण्यासाठी व अनु-जातीच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण लागू करण्याची प्रक्रिया रद्द करण्यासाठी रिपाइंच्या माध्यमातून राज्यभर लढा उभा करणार, अशी घोषणा यावेळी राजू जोगदंड यांनी केली.  यावेळी किसन तांगडे, शाहू डोळस, बापू पवार, अविनाश जोगदंड,महादेव बनसोडे, गोवर्धन वाघमारे, महेश आठवले, मायाताई मिसळे, रेश्माताई जोगदंड, शोभाताई गलांडे, शेख भाभी, अनिता तुरुकमारे,संभाजी गायकवाड, सुभाष तांगडे, अमोल धन्वे, ज्ञानोबा माने, अरुण कांबळे, रवि माने, रामेश्वर मराठे, सतिष शिनगारे, भिमराव घोडेराव,विशाल मिसळे, भाऊसाहेब कांबळे, विलास जोगदंड, महेंद्र वडमारे, भैय्या मस्के, पप्पू वाघमारे, भाऊसाहेब कांबळे, नामदेव वाघमारे, धम्मा पारवेकर, प्रा.बाळासाहेब गव्हाणे, अप्पा मिसळे, अक्षय कोकाटे, सचिन वडमारे, जितू धन्वे, राजू वक्ते, राहुल कांबळे, देवानंद वाघमारे, अप्पा शेळके, भास्कर जावळे, रतन वाघमारे, विशाल गव्हाणे, भैय्या वाघमारे, विशाल इंगोले, अजित सावंत, नवनाथ डोळस, अप्पा पवार, सुशील तांगडे, मनोज बोराडे, अड. सुरेश वडमारे, संजय हानवते, कुमार अरुण, सोनू वडमारे, दिपक कांबळे,  शाम वीर, सनी जोगदंड, के.के.कांबळे, गौतम कांबळे, यांच्यासह शेकडो रिपाइं कार्यकर्ते तिव्र निदर्शने आंदोलनात सामिल झाले होते.

COMMENTS