Homeताज्या बातम्या

सौ. के.एस.के. महाविद्यालयातील प्रा. डॉ. श्रीमंत तोंडे यांची ‘करिअर कट्टा’च्या बीड तालुका समन्वयक पदी निवड

बीड: उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणार्‍या म

विद्यार्थ्यांचे प्रश्न पक्षीय नाहीत, देशहित सर्वोच्च! ठाकरे बंधूंच्या टीकेला मुख्यमंत्री फडणवीसांचे प्रत्युत्तर
लोणी व्यंकनाथमध्ये बिबट्याचा थरार; एक बैल ठार, गाय बेपत्ता, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
आसाममध्ये ३.४ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के; कचार जिल्ह्यात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
प्रा. डॉ. श्रीमंत तोंडे यांची करिअर कट्टा बीड तालुका समन्वयकपदी निवड; विविध  स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव - Lokmanthan | लोकमंथन

बीड: उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणार्‍या महत्त्वाकांक्षी ‘करिअर कट्टा’ उपक्रमांतर्गत, बीड तालुका समन्वयक पदी सौ. केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर ऊर्फ काकू, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे प्रा. डॉ. श्रीमंत तोंडे यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल शैक्षणिक, साहित्यिक आणि सामाजिक क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य विकास, उद्योजकता, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि करिअरविषयक जागरूकता निर्माण करण्यासाठी करिअर कट्टा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात प्रभावीपणे राबविला जात आहे. या उपक्रमांतर्गत बीड तालुक्यातील महाविद्यालयांमध्ये विविध उपक्रम सुरळीत पार पाडणे, विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळवून देणे आणि शासनाचे धोरण तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याची मोठी जबाबदारी आता प्रा. डॉ. श्रीमंत तोंडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली आहे.

प्रा. डॉ. श्रीमंत तोंडे यांच्या या निवड झाल्याची माहिती समजताच नवगण शिक्षण संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डॉ. सुधाकर गुट्टे, डॉ. विश्वंभर देशमाने, महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. शिवानंद क्षीरसागर , उपप्राचार्य डॉ. संजय पाटील देवळाणकर, उपप्राचार्य डॉ. अनिता शिंदे, पदव्युत्तर विभाग प्रमुख डॉ. खान ए. एस. तसेच सहकारी प्राध्यापकवृंद, मित्रपरिवार तसेच विविध शिक्षणप्रेमी संस्थांच्या पदाधिकार्‍यांनी त्यांची भेट घेऊन पुष्पगुच्छ व सत्कार करत त्यांना भावी उज्ज्वल कार्यासाठी व यशस्वी कार्यकाळासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. या निवडीमुळे बीड तालुक्यातील विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन मिळण्यास अधिक गती मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

COMMENTS