Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पाटण बलात्कार प्रकरणातील आरोपींची नावे जाहीर करून कडक शिक्षा द्यावी

पाटण येथील संतप्त महिलांनी प्रशासनापुढे व्यक्त केल्या भावना, काळ्या फिती लावून निषेधपाटण / प्रतिनिधी : पाटण येथील 13 वर्षीय मतीमंद मुलीवर आठ नराध

महावितरणची डिजीटायजेशनकडे वाटचाल : ऑनलाईन वीजबिल भरणाऱ्यांचे प्रमाण वाढले
परजिल्ह्यातील ऊसतोड कामगारांनी पशुधनाच्या लसीकरणासाठी संपर्क साधण्याचे आवाहन
माण तालुक्यात अवैध वाळू उपसा; 17 लाख 45 हजाराचा मुद्देमाल जप्त

पाटण येथील संतप्त महिलांनी प्रशासनापुढे व्यक्त केल्या भावना, काळ्या फिती लावून निषेध
पाटण / प्रतिनिधी : पाटण येथील 13 वर्षीय मतीमंद मुलीवर आठ नराधमांनी बलात्कार केला हि घटना पाटण तालुक्यासह समस्त महिला भगिनींना चिड आणणारी असून यातील सर्व आरोपींना जास्तीत-जास्त शिक्षा मिळावी. यासाठी तालुक्याचे आजी-माजी लोकप्रतिनिधी व प्रशासनाने प्रयत्न करून पिडीतेला न्याय द्यावा, अशी मागणी पाटण येथील माहेर आधार केंद्र, दक्षता समिती व विविध क्षेत्रातील महिलांच्या वतीने करण्यात आली आहे.
पाटण येथील बलात्काराच्या घटनेनंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली असून पाटण येथील विविध महिला संघटनांच्या वतीने आरोपींवर कडक कारवाई होण्याबाबत पाटण प्रांताधिकारी, तहसिलदार, पोलीस निरीक्षकांना प्रत्यक्ष भेटून संतप्त महिलांनी आपला संताप व्यक्त केला. महिलांनी काळ्या फिती लावून या घटनेचा निषेध केला.
यावेळी विद्या म्हासुर्णेकर यांनी पाटण येथे घडलेल्या अमानुष प्रकाराची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली पाहिजे. स्त्री जातीला कलंक ठरलेल्या महिलेला कोणतीही सुट न देता कठोर कारवाई करावी. तसेच इतर आठ आरोपींना कडक शासन देउन उर्वरित आरोपी लवकरात लवकर शोधावे. या प्रकरणात कोणाकोणाची मिलिभगत आहे, याचा ही शोध घ्यावी. श्रीमंतीची वस्त्र परिधान करुन उधळ माथ्याने समाजात वावरणारी ही घाण हद्दपार करावी. लवकरात लवकर या आरोपींची नावे जनतेच्या समोर मांडावीत. तालुक्यातील महिला किती सुरक्षित आहेत हे गेल्या दोन महिन्यात दिसलेचे आहे. समाजातील भयभीत महिला व मुलींसाठी समुउपदेशन एका कार्यशाळेचे आयोजन करुन कायदा आपल्या दारी ही संकल्पना प्रशासनाने राबवावी.
आज काळ्या फिती लावून संघटित स्वरूपात आलो आहोत. या आरोपींची नावे काही दिवसात जनतेसमोर आणली गेली नाहीत तर महिला आक्रोश मोर्चा काढावा लागेल, असे मत व्यक्त केले.
पाटण तालुक्यात गेल्या दोन महिन्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या दोन घटना घडल्या असून माणुसकीला काळिमा फासणारी या घटना आहेत. पाटण येथील बलात्काराच्या घटनेची सखोल खोलवर चौकशी करून सहभागी सर्व आरोपींना कडक शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. यातून अनेक आणखी नावे समोर येण्याची शक्यता आहे. तपास यंत्रणांनी निपक्षपातीपणे तपास करावा, कोणासही पाठीशी घालू नये. गुन्ह्यातील सहभागी आरोपी महिलेचे निचकृत्य निंदणीय आहे. असहाय्य अल्पवयीन मुलीचा बाजार मांडणार्‍या त्या महिलेचे कृत्य समस्त महिला जातीला कलंक आहे. तिला कोणतीही सहानुभूती न दाखवता कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे. सभ्यतेचा बुरखा घेतलेल्यांचा बुरखा फाडला पाहिजे. अशा विकृती समाजात बिनधास्तपणे वावरत आहेत. त्यांना कायद्याचा धाक राहिला नाही. पाटणचे आजी-माजी लोकप्रतिनिधींनी लक्ष घातले पाहिजे. पाटण तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून महिला, बालिका अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. महिला, मुलींना बाहेर पडण्यास आता भिती वाटू लागली आहे. तालुक्याचा बिहार होण्याची वाट लोकप्रतिनिधी व प्रशासनाने पाहू पाहू नये. अशा संतप्त भावना उपस्थित महिलांनी यावेळी अधिकार्‍यांसमोर व्यक्त करून बलात्कार प्रकरणातील आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा होण्यासाठी आपण प्रयत्न करावा, अशी विनंती केली.
यावेळी पत्रकार विद्या म्हासुर्णेकर-नारकर, सुमन यादव, नंदा पवार, मिलन सय्यद, शोभा कदम, हसिना सय्यद, विद्या शिंदे, संगीता देसाई, अनिता नागावे, कोमल डावकरे, जयश्री जंगम, जयश्री चव्हाण, विद्या वायदंडे, किरण शेडगे, सारीखा शेडगे, किरण शेडगे, सहेली पवार, निता गुरव, रूपाली कुंभार, शशिकला कदम, सरिता देसाई, अर्चना पवार, शशिकला कदम, अनिता कदम, प्रियांका आरकडे यांच्यासह पाटण शहरातील विविध क्षेत्रातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
यावेळी प्रांताधिकारी सुनिल गाढे, तहसिलदार रमेश पाटील, पोलीस निरीक्षक निंगराज चौखंडे यांनी संतप्त महिलांच्या भावना जाणून घेत सखल प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपींना जास्तीत-जास्त शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्‍वासन दिले.

COMMENTS