Homeताज्या बातम्या

आत्मविश्वास, संयम आणि संघटन कौशल्य या गुणांवर उत्तम नेतृत्व बहरते – डॉ. यशवंत राजेभोसले

माजलगाव: येथील श्री सिध्देश्वर माध्यमिक विद्यालयात विद्यार्थी नेतृत्व गुण विकास शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी डॉ. यशवंत राजेभोसले बोलत होते. यावेळी

मंत्री राणे यांना कोर्टाकडून दिलासा
नीट निकालातील गोंधळाची उच्चस्तरीय चौकशी करा : खा. बजरंग सोनवणे
बीडकरांना वेठीस धरणारा मुजोर अभियंता राजेंद्र भोपळे हटाव, बीड जिल्हा बचावराष्ट्रीय महामार्गांच्या निकृष्ट कामांविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने-डॉ.गणेश ढवळे
Shri Siddheshwar Vidyalaya Majalgaon (@SSVMAJALGAON) • Facebook

माजलगाव: येथील श्री सिध्देश्वर माध्यमिक विद्यालयात विद्यार्थी नेतृत्व गुण विकास शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी डॉ. यशवंत राजेभोसले बोलत होते. यावेळी त्यांनी सांगितले की, नेतृत्व करण्यासाठी वयाची मर्यादा नसते. उत्तम नेतृत्व निर्माणासाठी आत्मविश्वास, संघटन कौशल्य, संयम आणि शिस्त हे सर्व गुण शालेय जीवनात अशा शिबिरांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये रुजवले जातात. यावेळी त्यांनी मास्टर ब्लास्टर, भारतरत्न सचिन तेंडुलकर, शास्त्रज्ञ थॉमस एडिसन यांच्या जीवनातील प्रसंगाचा संदर्भ देऊन नेतृत्व गुणाविषयी अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले.

या शिबिराचे उद्घाटन दीपप्रज्वलन, माता सरस्वती व पंच परिवर्तन प्रतिमेचे पूजन करून झाले. या सत्राचे अध्यक्ष भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य तथा श्री सिध्देश्वर शैक्षणिक संकुलाचे पालक प्रकाश दुगड हे होते. तसेच श्री सिध्देश्वर शैक्षणिक संकुलाचे कार्यवाह ॲड. विश्वास जोशी, माध्यमिक शालेय समितीचे अध्यक्ष प्रशांत भानप, शिबीर निरीक्षक श्रीकांत देशपांडे, शाळेचे मुख्याध्यापक संतोष लिंबकर सर इत्यादी उपस्थित होते.

या सत्राचे अध्यक्षीय समारोप करताना विद्यार्थ्यांनी नेतृत्वासाठी आवश्यक असणारे गुण आत्मसात केले पाहिजेत असे सांगितले. आज आपल्या विद्यालयातील माजी विद्यार्थी समाजात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत नेतृत्व करत आहेत. प्रास्ताविक करताना मुख्याध्यापक संतोष लिंबकर सर यांनी सांगितले की, नेतृत्व गुण हे जन्मतः नसतात तर ते आत्मसात करून नेतृत्व साकारले जाते; हे सांगताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद यांच्या जीवनाचे उदाहरण दिले.

या सत्राचे सूत्रसंचालन कु. अपूर्वा गोरे हिने केले तर आभार अभ्यास पूरक मंडळ सहप्रमुख रोहित खिंडरे यांनी मानले. यावेळी उपमुख्याध्यापक ज्ञानेश मातेकर सर, पर्यवेक्षक रवींद्र खोडवे, सदाशिव ढगे, कमलाकर झोडगे, परमेश्वर आदमाने, अभ्यास पूरक मंडळ प्रमुख प्रभाकर बनसोडे, सर्व शिक्षक उपस्थित होते.

COMMENTS