Homeताज्या बातम्या

सातवी शिष्यवृत्ती परीक्षेत राष्ट्रीय प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थिनींचे घवघवीत यश

बीड: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या सातवी शिष्यवृत्ती परीक्षा-२०२६ च्या निकालात राष्ट्रीय प्राथमिक व माध्यमिक

जिल्हा बँकेच्या रणांगणात आज निकालाचा थरार; प्रस्थापित धक्का की पुन्हा वर्चस्व?
सौर ऊर्जा, जलसंधारणातील कामांची दखल; तिगावच्या सरपंच अर्चना राज पाटील यांना लोकमत सरपंच अवॉर्ड 2026
शेतकर्‍यांना कृषी विभागाचे आवाहनकडधान्य प्रक्रिया केंद्रासाठी अर्ज सादर करावेत

बीड: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या सातवी शिष्यवृत्ती परीक्षा-२०२६ च्या निकालात राष्ट्रीय प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, बीड येथील विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश संपादन केले. कु. श्रावणी सुरेंद्र क्षीरसागर व कु. आदिती दत्तात्रय बरकसे यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवत शाळेच्या शैक्षणिक परंपरेत आणखी एका मानाच्या यशाची भर घातली.

विद्यार्थिनींच्या या यशाबद्दल प्रियदर्शनी एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष मा. श्री. सिराजोद्दीन देशमुख, सचिव मा. श्री. सुभाषचंद्र सारडा तसेच आदित्य एज्युकेशन ग्रुपच्या संचालिका मा. डॉ. आदिती सारडा यांनी त्यांचे विशेष कौतुक करून हार्दिक अभिनंदन केले.

राष्ट्रीय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्री. पाटील पी. एन., प्रियदर्शनी प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. पाटील ए. आय. तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी विद्यार्थिनींना पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या यशामागे श्री. जाधव व्ही. पी., श्री. पवार ए. एन. आणि श्री. बोरवडे डी. आर. या शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थिनींच्या या यशाबद्दल पालक, शिक्षक आणि परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

COMMENTS