Homeताज्या बातम्या

सैनिकी विद्यालयात कारगिल विजय दिन उत्साहात साजरा; शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली

बीड: नवगण शिक्षण संस्था राजुरी संचलित सैनिकी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात कारगिल विजय दिवस अत्यंत उत्साहात व देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा

पाटोदा तालुक्यातील चिंचोली जिल्हा परिषद शाळेची भिंत वर्ष उलटूनही दुरुस्त नाही; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
प्रेमसंबंधाला विरोध करत आईने ओढणीने आवळला १९ वर्षीय मुलीचा गळा; उल्हासनगरमधील धक्कादायक घटना
येमेनचा सौदी अरेबियावर प्रत्युत्तरात्मक क्षेपणास्त्र हल्ला; पश्चिम आशियात तणाव वाढला

बीड: नवगण शिक्षण संस्था राजुरी संचलित सैनिकी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात कारगिल विजय दिवस अत्यंत उत्साहात व देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला असल्याची माहिती विद्यालयाचे प्राचार्य सचिन पवार यांनी दिली.

कारगिल युद्धादरम्यान देशाचे रक्षण करताना सर्वोच्च बलिदान दिलेल्या अमर शहीद जवानांना सैनिकी विद्यालयाचे प्राचार्य सचिन पवार यांनी पुष्पचक्र अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

यावेळी सेना पदक विजेते सैनिकी निदेशक मेघराज कोल्हे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना देशाभिमान, राष्ट्रभक्ती, सैनिकांचे शौर्य आणि कारगिल विजय दिवसाचे अनन्यसाधारण महत्त्व याविषयी सविस्तर माहिती दिली. माजी सैनिक विजयकुमार धारणकर, डॉ. अविनाश बारगजे, माजी सैनिक अण्णासाहेब लगड आणि माजी सैनिक आप्पासाहेब जगताप यांनी या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले तसेच शहिदांना पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.

याप्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

COMMENTS