Homeताज्या बातम्या

कुंडलवाडी येथे ऐतिहासिक श्री राम मंदिरात गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन; विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

कुंडलवाडी: येथील सुमारे ३६० वर्षांची परंपरा लाभलेल्या श्री समर्थ रामदास स्वामींच्या अकराशे मठांपैकी एक असलेल्या रामदासी मठ, श्रीराम मंदिर येथे बु

सोनम वांगचुक यांच्यावरील कारवाईचा बीडमध्ये निषेध; विद्यार्थ्यांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन
नीट पेपर लीकप्रकरणी बिहार बंद दरम्यान हिंसाचार; सीवानमध्ये दगडफेकीत एसपी जखमी, तेजप्रताप यादव पोलिसांच्या ताब्यात
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त बेलापूरमध्ये रक्तदान शिबीर उत्साहात पारदर्शक

कुंडलवाडी: येथील सुमारे ३६० वर्षांची परंपरा लाभलेल्या श्री समर्थ रामदास स्वामींच्या अकराशे मठांपैकी एक असलेल्या रामदासी मठ, श्रीराम मंदिर येथे बुधवार, दि. २९ जुलै २०२६ रोजी गुरुपौर्णिमा महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.

महोत्सवानिमित्त पहाटे ५ ते ५.३० या वेळेत काकडा आरती, सकाळी ६ ते ९ दरम्यान श्रीराम पंचायतन अभिषेक आणि सकाळी १० ते ११ वाजता सद्गुरू पाद्यपूजनाचा विशेष कार्यक्रम पार पडणार आहे. त्यानंतर दुपारी १२ ते १ या वेळेत महानैवेद्य व महाआरती होईल, तर दुपारी १ ते २ या वेळेत महाप्रसाद भंडार्‍याचे आयोजन करण्यात आले आहे.

गुरुपौर्णिमा महोत्सवानिमित्त होणार्‍या सर्व धार्मिक कार्यक्रमांचा आणि महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्रीराम मंदिराचे अर्चक रघुवीर महाराज रामदासी यांनी केले आहे. गुरुभक्त व भाविकांच्या उपस्थितीत हा उत्सव अत्यंत भक्तिमय वातावरणात साजरा होणार असल्याने संपूर्ण कुंडलवाडी परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

COMMENTS