Homeताज्या बातम्या

पालवन शिवारात महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला; हत्या की आत्महत्या? बीड ग्रामीण पोलिसांचा तपास सुरू

बीड: बीड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पालवन शिवारात एका महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मस्के यांच्

पाण्याचा घोट, हरिपाठाची भेट; दत्ता वाकसे यांची वारकर्‍यांना प्रेमाची साथ! मकरध्वज दिंडीला महाप्रसाद
लोकमंथन इफेक्ट: चहाच्या पाकिटावर आता उत्पादन दिनांकासह मुदतही स्पष्ट; श्रीगोंद्यातील बातमीचा मोठा परिणाम
महाराष्ट्राच्या जनतेची मालमत्ता राखा !

बीड: बीड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पालवन शिवारात एका महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मस्के यांच्या शेतात हा मृतदेह आढळून आला असून, मृतदेहाची अवस्था पाहता घटनेचे गूढ वाढले आहे. हा प्रकार हत्या आहे की आत्महत्या, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पालवन शिवारातील मस्के यांच्या शेतात दुर्गंधी येत असल्याने परिसरातील नागरिकांनी पाहणी केली असता एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती तातडीने बीड ग्रामीण पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला. मृतदेह अत्यंत कुजलेल्या आणि अर्धनग्न अवस्थेत आढळून आल्याने या घटनेबाबत संशय व्यक्त केला जात आहे. मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नसून, महिलेचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.

घटनेची गंभीरता लक्षात घेता पोलीस अधीक्षक नवनीत काँवत आणि अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच फॉरेन्सिक पथक आणि श्वान पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे गोळा करण्यात आले असून, प्रत्येक बाबीचा बारकाईने तपास केला जात आहे.

मृतदेहाची अवस्था पाहता मृत्यूला अनेक दिवस उलटले असावेत, असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. मृतदेहावर आळ्या आढळून आल्याने शवविच्छेदन अहवालातून मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांकडून परिसरातील बेपत्ता महिलांच्या नोंदी तपासल्या जात असून, महिलेची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. परिसरातील नागरिकांची चौकशी, तांत्रिक माहिती, फॉरेन्सिक अहवाल आणि इतर पुराव्यांच्या आधारे पुढील तपास केला जाणार आहे.

या घटनेमुळे पालवन शिवारासह परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये विविध चर्चांना उधाण आले आहे. मात्र तपास पूर्ण होईपर्यंत मृत्यूचे कारण सांगणे शक्य नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. शवविच्छेदन आणि फॉरेन्सिक अहवालानंतरच या घटनेचे सत्य समोर येणार आहे.

COMMENTS