Homeताज्या बातम्या

बीड जिल्ह्यातील ९७ हजार २२२ शेतकर्‍यांची कर्जमाफी यादी जाहीर; आधार प्रमाणीकरणाचे प्रशासनाचे आवाहन

बीड: महाराष्ट्र शासनाच्या ’पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना-२०२६’ अंतर्गत बीड जिल्ह्यातील ११ तालुक्यांतील एकूण १,३०५ गावांमधील ९७ हज

मुख्यमंत्री महाआरोग्य शिबिराचा शुभारंभ; ६ ऑगस्टला आष्टीत भव्य आरोग्य मेळावा
तामसा पोलिसांची धडाकेबाज कारवाई; अवैध देशी दारूसह दोन जेरबंद, ९३ हजारांचा मुद्देमाल जप्त
निर्भीड पत्रकार संघाच्या परळी तालुका अध्यक्षपदी बालाजी ढगे, उपाध्यक्षपदी कृष्णा सरवदे यांची बिनविरोध निवड
Maharashtra Farm Loan Waiver Pune: शेतकरी कर्जमाफीची दुसरी यादी आज जाहीर  होणार, पुणे जिल्हा बँकेच्या 61 हजार 900 शेतकऱ्यांना 523 कोटींचा लाभ मिळणार  | Maharashtra Farm ...

बीड: महाराष्ट्र शासनाच्या ’पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना-२०२६’ अंतर्गत बीड जिल्ह्यातील ११ तालुक्यांतील एकूण १,३०५ गावांमधील ९७ हजार २२२ शेतकर्‍यांची कर्जमाफीसाठीची पात्र यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये राष्ट्रीयकृत बँका तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडील थकीत कर्जदार शेतकर्‍यांची नावे, कर्जाची रक्कम आणि प्रत्येक लाभार्थ्याला देण्यात आलेला विशिष्ट क्रमांक नमूद करण्यात आला आहे.

जिल्ह्यात सध्या ४३८ ’आपले सरकार’ सेवा केंद्रे कार्यरत असून, पात्र शेतकर्‍यांनी आवश्यक कागदपत्रांसह जवळच्या सेवा केंद्रात जाऊन पडताळणी व आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. पडताळणीसाठी आधार कार्ड, कर्ज खाते व बचत खात्याचे पासबुक, तसेच यादीतील नावासमोरील विशिष्ट क्रमांक सोबत घेऊन जाणे आवश्यक आहे.

याशिवाय अ‍ॅग्रीस्टॅक (AgriStack) नोंदणी अनिवार्य करण्यात आली असून, नोंदणी पूर्ण झाल्यानंतरच पुढील प्रक्रिया केली जाणार आहे. कर्जमाफीची यादी संबंधित सेवा सहकारी संस्था, ग्रामपंचायत, बँक शाखा तसेच सहाय्यक निबंधक (सहकारी संस्था) कार्यालयांमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे.

लाभार्थी शेतकर्‍यांचे आधार प्रमाणीकरण वेळेत पूर्ण व्हावे यासाठी संबंधित यंत्रणांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) सतीश तोटावार यांनी पात्र शेतकर्‍यांना विनंती केली आहे की, विलंब न करता आवश्यक कागदपत्रांसह जवळच्या ’आपले सरकार’ सेवा केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करावी, जेणेकरून कर्जमाफीचा लाभ वेळेत मिळू शकेल.

COMMENTS