Homeताज्या बातम्या

विठ्ठल नामाच्या गजरात सहयोग कॅम्पस झाला भक्तिमय; चिमुकल्या वारकर्‍यांच्या दिंडीने वेधली सर्वांची मने

नांदेड: आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त विष्णुपुरी येथील सहयोग कॅम्पसमधील इंदिरा इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ’मिनी पंढर

महावितरणच्या कोतूळ उपकेंद्राचा कारभार रामभरोसे; ‘सहाय्यक अभियंता’ पद रिक्त; वारंवार चकरा माराव्या लागत असल्याने नागरिकांत संताप
जामखेड कडकडीत बंद! दिल्लीत विद्यार्थ्यांवरील लाठीमाराचे तीव्र पडसाद; केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करत तहसीलवर सर्वपक्षीय मोर्चा
अहंकाराचा त्याग करून विठ्ठलभक्तीत लीन व्हा : हभप चेडे; शेवगाव येथील दध्नेश्वर शिवालयात विशेष हरिकीर्तन महोत्सव संपन्न
Home - INDIRA INTERNATIONAL PUBLIC SCHOOL VISHNUPURI

नांदेड: आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त विष्णुपुरी येथील सहयोग कॅम्पसमधील इंदिरा इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ’मिनी पंढरी’ दिंडी सोहळ्याने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. ज्ञानोबा-तुकाराम, माऊली… माऊली…, विठ्ठल… विठ्ठल… या अखंड नामघोषाने सहयोग कॅम्पस दुमदुमून गेला. पारंपरिक वारकरी वेशभूषेत सजलेल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी टाळ, भगवे झेंडे, तुळशीवृंदावन आणि डोक्यावर तुळशीची कुंडी घेऊन शिस्तबद्ध दिंडीत सहभाग नोंदवत उपस्थितांना पंढरपूरच्या वारीची अनुभूती दिली.

कार्यक्रमाची सुरुवात सहयोग सेवाभावी संस्थेचे सचिव डॉ. संतुकराव हंबर्डे यांच्या हस्ते पालखी पूजनाने झाली. त्यानंतर त्यांनी स्वतः पालखी खांद्यावर घेत दिंडीचे नेतृत्व केले. विद्यार्थ्यांनी अभंग, भजन आणि विठ्ठल नामाचा अखंड गजर करत पालखीची भक्तिभावाने मिरवणूक काढली. दिंडीदरम्यान विद्यार्थ्यांनी सादर केलेले वारकरी परंपरेवरील नृत्याविष्कार विशेष आकर्षण ठरले. त्यांच्या निरागस, उत्स्फूर्त आणि मनमोहक सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांचा उत्साह पाहून शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकही भक्तिरंगात सहभागी झाले.

यावेळी शाळेचे प्राचार्य विक्रम ढोणे, उपप्राचार्या रुपाली गुंडाळे, तसेच अशोक मेटकर, विष्णुकांता पवार, सुनंदा शेळके, हेमा येलके, विजयश्री तेलंगे, नरेंद्रकुमार वनंजे, बुधदेव सोनपारखे यांच्यासह सहयोग कॅम्पसमधील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे कौतुक करत अशा सांस्कृतिक व धार्मिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृती, वारकरी संप्रदायाची परंपरा, भक्तीभाव, शिस्त, सामाजिक बांधिलकी आणि एकात्मतेची भावना अधिक दृढ होते, असे मत व्यक्त केले. उत्साह, शिस्त आणि भक्तीभाव यांचा सुंदर संगम असलेला हा दिंडी सोहळा सर्वांच्या स्मरणात राहील असा ठरला.

COMMENTS