Homeताज्या बातम्या

आषाढी एकादशीनिमित्त भगवानगडावर पाच लाख भाविकांची उपस्थिती; विजयी पांडुरंगाचे व भगवानबाबांचे घेतले दर्शन

खरवंडी कासार: देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त 'धाकटी अलंकापुरी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र भगवानगडावर लाखो भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी

कोपरगावात राष्ट्रवादीच्या वतीने स्व. अजित पवार यांना अभिवादन; त्यांच्या कार्याला वाहण्यात आली आदरांजली
अंगणवाडी सेविकांच्या हक्कांसाठी ठोस निर्णय घ्यावेत; खा. श्रीकांत शिंदे यांना शिवसेना महिला आघाडीचे निवेदन
सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा २६ वा दिवस

खरवंडी कासार: देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त ‘धाकटी अलंकापुरी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र भगवानगडावर लाखो भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली. महाराष्ट्रासह राज्याबाहेरील अनेक भागांतून आलेल्या भाविकांनी विजयी पांडुरंग व वै. ह. भ. प. श्री संत भगवानबाबा यांच्या समाधीचे दर्शन घेऊन भक्तिभावाने आषाढी एकादशी साजरी केली.

वारकरी संप्रदायात आषाढी एकादशीला विशेष धार्मिक महत्त्व असून, या दिवशी संतांच्या पालख्या पंढरपूरकडे प्रस्थान करतात. श्री संत ज्ञानेश्वर महाराज, श्री संत तुकाराम महाराज, श्री संत निवृत्तीनाथ महाराज, श्री संत मुक्ताबाई, श्री संत सोपानकाका महाराज, श्री संत एकनाथ महाराज तसेच श्री क्षेत्र भगवानगडावरून श्री संत भगवानबाबांची पालखीही पंढरपूरकडे रवाना होते. पंढरपूरला जाणे शक्य नसलेल्या भाविकांसाठी भगवानगड हे श्रद्धेचे प्रमुख केंद्र ठरते.

यावर्षी आषाढी एकादशीनिमित्त सुमारे पाच लाख भाविकांनी भगवानगडावर दर्शन घेतल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. यानिमित्त भारजवाडी ग्रामस्थांच्या वतीने सुमारे शंभर क्विंटल साबुदाण्याच्या फराळाचे अन्नदान करण्यात आले. हजारो भाविकांनी या फराळाचा लाभ घेत ग्रामस्थांच्या सेवाभावाचे कौतुक केले. दरवर्षी आषाढी एकादशीचा फराळ भारजवाडी ग्रामस्थांकडून, तर कार्तिकी एकादशीचा फराळ घोगस पारगाव ग्रामस्थांकडून आयोजित केला जातो. अनेक वर्षांपासून सुरू असलेली ही सेवा परंपरा यंदाही उत्साहात पार पडली.

दरम्यान, भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेऊन पोलीस प्रशासनासह घोगस पारगाव, माळेगाव, एकनाथवाडी आणि भालगाव येथील युवकांनी पार्किंग, वाहतूक, दर्शनरांग आणि सुरक्षेचे नियोजन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने सांभाळले.

COMMENTS