Homeताज्या बातम्या

टीईटी प्रश्नपत्रिका फुटीचा मुख्य सूत्रधार बिहारमधून अटकेत; भिवंडी पोलिसांची मोठी कारवाई

मुंबई: राज्यातील शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणातील मुख्य सूत्रधार म्हणून संशयित असलेल्या बिजेंद्र (वीरेंद्र) कुमार गुप

एखाद्या अभ्यासू चिकित्सकाने एसआयआर प्रक्रियेवर पीएचडी करावी; नागरिकांची त्रस्त अवस्था बघून मुक्त पत्रकार एस.एम.युसूफ़ यांचे आवाहन
राज्यात पुढील ४८ तासांत पावसाचा जोर वाढणार! पुणे, मराठवाडा व विदर्भासाठी सतर्कतेचा इशारा
विजेचा शॉक लागून १४ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू; राहुरी तालुक्यातील सडे येथील हृदयद्रावक घटना
TET paper Case Accused Arrested : टीईटी पेपरफुटी प्रकरणात पोलिसांची मोठी  कारवाई; फरार मुख्य आरोपी बिजेंद्र गुप्ताला बिहारमधून अटक | TET paper Leak  Case absconding prime ...

मुंबई: राज्यातील शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणातील मुख्य सूत्रधार म्हणून संशयित असलेल्या बिजेंद्र (वीरेंद्र) कुमार गुप्ता याला बिहारमधून अटक करण्यात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. अनेक दिवसांपासून फरार असलेल्या गुप्ताला भिवंडी पोलिसांच्या विशेष पथकाने गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत ताब्यात घेतले.

अटकेनंतर आरोपीला हवाई मार्गाने पुण्यात आणण्यात आले असून, तेथून कडेकोट पोलीस बंदोबस्तात भिवंडी येथे नेण्यात येत आहे. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर करून पुढील कोठडीची मागणी करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या प्रकरणातील संपूर्ण गैरप्रकाराचा उलगडा करण्यासाठी गुप्ताची चौकशी अत्यंत महत्त्वाची ठरणार असल्याचे तपास अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्याच्याकडून प्रश्नपत्रिका फुटीमागील जाळे, इतर सहभागी साथीदार, आर्थिक व्यवहार आणि राज्याबाहेरील संपर्क याबाबत महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता आहे.

प्राथमिक तपासात प्रश्नपत्रिका छपाई प्रक्रियेदरम्यानच बाहेर काढल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. छपाईशी संबंधित काही व्यक्तींना पैशांचे व इतर लाभांचे आमिष दाखवून प्रश्नपत्रिका मिळवण्यात आल्याचा आरोप आहे. त्यानंतर या प्रश्नपत्रिका मोठ्या रक्कमेत विक्रीसाठी उपलब्ध करून देण्याचा कट रचल्याचे तपासातून समोर आले आहे.

या गैरप्रकाराची माहिती मिळताच भिवंडी पोलिसांनी नियोजनबद्ध सापळा रचला होता. बनावट ग्राहकाच्या माध्यमातून आरोपीशी संपर्क साधून व्यवहार सुरू असतानाच यापूर्वी कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणात यापूर्वीच १२ जणांना अटक करण्यात आली होती. आता मुख्य सूत्रधारही पोलिसांच्या जाळ्यात आल्याने तपासाला अधिक वेग मिळण्याची अपेक्षा आहे.

तपासादरम्यान आरोपीविरुद्ध इतर राज्यांतील प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणांशी संबंधित नोंदी असल्याची माहिती समोर आली आहे. जामिनावर सुटल्यानंतर तो वारंवार ठिकाण आणि ओळख बदलत असल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे त्याच्या चौकशीतून देशभरात कार्यरत असलेल्या अशा गैरप्रकारांच्या साखळीबाबत महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या कारवाईनंतर टीईटी प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणातील उर्वरित संशयितांचा शोध अधिक तीव्र करण्यात आला असून, या कटात सहभागी असलेल्या इतर व्यक्तींवरही लवकरच कठोर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

COMMENTS