Homeताज्या बातम्या

दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ केज बंदला उत्स्फूर्त प्रतिसादव्यापारी, नागरिक, विद्यार्थी व विविध संघटनांचा सहभाग; तहसीलदारांना निवेदन

नवी दिल्ली येथे जंतर-मंतर मैदानावर कॉकरोच पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके व ज्येष्ठ साहित्यिक संशोधक सोनम वांगचुक यांच्यासह विद्यार्थ्यांच

भर पावसामध्ये गटनेते हारूणभाई इनामदार यांनी शहरातील विविध भागांची केली पाहणीनगर पंचायतच्या स्वच्छता कर्मचार्‍यांना नाले व गटारींची नियमित स्वच्छता करण्याच्या दिल्या
भांडण सोडवायला गेलेल्या निष्पाप तरुणाचा खूनकेज तालुक्यात संतापाची लाट, आरोपींच्या अटकेसाठी रस्ता रोको
केजमध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या स्वागताला वरुणराजाची हजेरी!भर पावसात शिवसैनिकांचा उत्साह शिगेला; ठाकरेंच्या स्वागतासाठी केज शहरात जनसागर



नवी दिल्ली येथे जंतर-मंतर मैदानावर कॉकरोच पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके व ज्येष्ठ साहित्यिक संशोधक सोनम वांगचुक यांच्यासह विद्यार्थ्यांचे गेल्या अनेक दिवसापासून आंदोलन शांततेत सुरू असून लाखोच्या संख्येने विद्यार्थी हे आपल्या न्याय्य हक्कांसाठी  शांततापूर्ण संविधानिक पद्धतीने शांततेच्या मार्गाने आंदोलन करणार्‍या आंदोलक, विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी दिनांक 23रोजी महाराष्ट्र बंदचे आवाहन केले. अ‍ॅड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत दिनांक 23 जुलै 2026 केज शहरात शांततेत बंद पाळण्यात आला. या बंदला सर्व संघटना,राजकीय पक्ष, व्यापारी, विद्यार्थी व नागरिक आणि ड. बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर प्रेम करणार्‍या जनतेने उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देवून आंदोलनाला जाहीर पाठिंबा दर्शविला आहे.
गुरुवार रोजी सकाळी 11 ते 11-15 वाजण्याच्या सुमारास शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून सुरुवात करण्यात आली.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौका पासुन रॅली मंगळवार पेठ मार्गे मंगळवार पेठ कॉर्नर मार्गे मुख्य रस्त्याने कानडी चौक मार्गे कानडी रोड, परत याच मार्गाने राष्ट्रसंत भगवान बाबा चौक मार्गे मुख्य रस्त्याने छत्रपती शिवाजी चौक मार्गे तहसील कार्यालय येथे रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये  जय भीम, जय संविधान यासह इतर नार्‍याने व  घोषणांनी संपुर्ण केज दुमदुमून गेले होते. केज शहरातील व्यापार्‍यांनी रॅलीमध्ये सहभागी होत स्वयंपूर्ण स्वतःचे व्यवसाय बंद करून सदरील बंद मध्ये सहभागी झाले होते.  रॅली तहसीलकार्यालया समोर पोहोचल्यानंतर सर्व संघटना डाव्या पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी आंदोलनात सहभागी होऊन जाहीर पाठिंबा दिला. व दिल्ली येथे जंतर मंतर येथे चालू असलेल्या आंदोलनात विद्यार्थ्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला. वंचित बहुजन आघाडीचे व पाठिंबा दर्शविलेल्या सर्व संघटना आणि पक्षाचे निवेदन  तहसीलचे नायब तहसीलदार अशोक भंडारे यांनी स्वीकारले. लेखी दिलेल्या निवेदनात म्हटले की, विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याऐवजी त्यांच्यावर बलप्रयोग करणे हा भारतीय लोकशाही, संविधान आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गंभीर आघात असून या घटनेची उच्चस्तरीय न्यायालयीन चौकशी करण्यात यावी, दोषी अधिकार्‍यांवर कठोरातील कठोर कारवाई करावी करण्यात यावी, विद्यार्थ्यांच्या न्याय्याच्या, मागण्या तातडीने मान्य करण्यात यावात, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, भविष्यात अशा घटना घडणार नाहीत. याची शासनाने हमी द्यावी, त्याचबरोबर संपूर्ण घटनेची नैतिक व राजकीय जबाबदारी स्वीकारून पंतप्रधानांनीही राजीनामा द्यावा, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. केज बंद च्या आंदोलनाला भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा व शहर शाखा, जन विकास परिवर्तन आघाडीचे प्रमुख हारुणभाई इनामदार, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष राहुल सोनवणे, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बीड जिल्हा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा नसरीन बानू बागवान, शेतकरी कामगार पक्षाचे राज्य सरचिटणीस भाई मोहन गुंड, बहुजन विकास मोर्चाचे तालुकाध्यक्ष लखन हजारे,प्राचार्य डॉ. हनुमंत सौदागर, सामाजिक कार्यकर्ते प्राध्यापक हनुमंत भोसले यांच्यासह सर्व संघटना व डाव्या पक्षांच्या लोकप्रतिनिधी, पदाधिकार्‍यांनी जाहीर पाठिंबा देऊन दिल्ली येथे जंतर मंतर मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनातील विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचा जाहीर निषेध दर्शवून वरील मागणीस समर्थन दर्शविले. जर प्रशासनाने वरील मागण्या तात्काळ मंजूर न केल्यास यापुढे रस्त्यावर उतरून मोठे जन आंदोलन करण्यात येईल असा शासन प्रशासनाला इशारा देण्यात आला.  या आंदोलन रॅलीमध्ये सर्व संघटना, डाव्या आघाडी पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते, व्यापारी, विद्यार्थी व वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आणि भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी त्याचबरोबर ड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर प्रेम करणारे नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सदरील मोर्चा रॅली हे शांततेत पार पडली या बंदसाठी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी अथक परिश्रम घेतले.सदरचा बंद आंदोलन यशस्वी पार पाडले. या अंदोलनाचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला. या मोर्चा दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस प्रशासनाकडून  मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

COMMENTS