Homeताज्या बातम्या

पिंपळवाडी येथे ‘देवाभाऊ कृषी माऊली सोहळा’ उत्साहात संपन्नशेकडो शेतकरी महिलांना शेती अवजारांच्या कीटचे वाटप

बीड तालुक्यातील पिंपळवाडी येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भाजप महिला मोर्चाच्या वतीने ‘देवाभाऊ कृषी माऊ

गेवराईत प्रशासनाचा बेजबाबदारपणा शिगेला; लिलाव रक्कम अडकली, तरुणाने जिल्हाधिकार्‍यांकडे आत्महत्येची परवानगी मागितली; तहसीलदारांसह सहा अधिकार्‍यांवर गंभीर आरोप; अडीच वर्षे पैसे न मिळाल्याने कर्जबाजारी तरुणाचा टोकाचा इशारा
यंदा पाऊस चांगला झाल्याने तुर पिकं डोलु लागल्याने शेतकरी समाधानी 
राजमाची येथील विहिरीत पडलेल्या रानडुक्कराला जीवनदान



बीड तालुक्यातील पिंपळवाडी येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भाजप महिला मोर्चाच्या वतीने ‘देवाभाऊ कृषी माऊली सोहळा’ अतिशय उत्साहात आणि शेकडो शेतकरी महिलांच्या उपस्थितीत पार पडला. महिला शेतकर्‍यांच्या कष्टांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात महिलांना शेतात उपयुक्त ठरणारी विशेष कृषी अवजारे कीट वितरित करण्यात आली.
हा सोहळा भाजपचे ज्येष्ठ नेते व भाजप जिल्हा उपाध्यक्ष नवनाथ अण्णा शिराळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पिंपळवाडी गावच्या सरपंच शोभाताई बहिरवाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. कष्टाला सन्मान शेतकरी महिलांना मदतीचा हात असे ब्रीद वाक्य घेऊन  शेतात दिवस-रात्र घाम गाळणार्‍या महिला शेतकर्‍यांचे श्रम कमी व्हावेत आणि त्यांना आधुनिक अवजारांची मदत मिळावी, यासाठी या सोहळ्यात पिंपळवाडी व परिसरातील शेकडो महिलांना शेतीसाठी लागणार्‍या दैनंदिन अवजारांची कीट देण्यात आली. कीट हातात पडताच शेतकरी महिलांच्या चेहर्‍यावर आनंदाचे वातावरण पाहावयास मिळाले. महिला शेतकर्‍यांच्या कष्टांना सन्मान देणारा हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. देवाभाऊंनी (देवेंद्र फडणवीस) नेहमीच बळीराजा आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत. या वेळी भाजप महिला मोर्चाच्या जिल्हा प्रभारी: ड. संध्या राजपूत (प्रदेश सचिव, भाजप महिला मोर्चा), डॉ वणवे- वैद्यकीय आघाडी अध्यक्ष, माजी सरपंच महादेव बहिर्वाळ, विशाल पाखरे , रवींद्र कळसाने, सुवर्णाताई लांबरूड- भाजपा महिला जिल्हा अध्यक्ष, मीरा गांधले भाजपा जिल्हा सरचिटणीस, डॉ ज्योती घुमरे भाजपा नेत्या , प्रीत कुकडेजा शहर उपाध्यक्ष, शैलाताई मुसळे ,कांता बांगर , भाग्यश्री ढाकणे इतर पदाधिकारी विविध पदाधिकार्‍यांची आणि स्थानिक ग्रामस्थांची मोठी उपस्थिती होती. कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दीर्घायुष्यासाठी व आरोग्यदायी जीवनासाठी प्रार्थना करण्यात आली. देवाभाऊंना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा! आपले नेतृत्व जनतेसाठी सदैव प्रेरणादायी राहो, अशा भावना या वेळी उपस्थित महिला व कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी भाजप महिला मोर्चाचे पदाधिकारी, पिंपळवाडी ग्रामपंचायतीचे सदस्य आणि ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.

COMMENTS